काही खाल्लं आहे का?’ — सत्तेच्या शिखरावरचा हा माणुसकीचा प्रश्न

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल
नगरदेवळा प्रतिनिधी:-
राजकारण म्हणजे फक्त सत्तेची गणितं, कडक निर्णय आणि कठोर शब्द… अशी सर्वसाधारण समजूत असते. पण काही नेते असे असतात, ज्यांच्या एका साध्या वाक्यातून संपूर्ण माणुसकी उलगडते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते अजित पवार यांच्याबाबत उत्तर महाराष्ट्र युवती अध्यक्ष अभिलाषा रोकडे यांनी सांगितलेला एक अनुभव याच सत्याची साक्ष देतो.
मुंबईला पहिल्यांदाच जाण्याचा तो दिवस. त्याच काळात जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळालेली. पक्ष संघटनेच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी अभिलाषा रोकडे मुंबईत दाखल झाल्या. बैठकीनंतर अजित पवार यांची भेट घ्यायची ठरली. देवगिरी बंगल्याबाहेर अफाट गर्दी होती. नवख्या मनात दडपण, भीती आणि संकोच एकाच वेळी दाटून आला.
आत गेल्यावर वातावरण अधिकच गंभीर होते. अजित पवार एका अधिकाऱ्यावर चिडले होते.
“हे काम चुकीचं केलं आहे. असं काम कोणी करतं का?”
तो कडक, ठाम आवाज ऐकून क्षणभर मन गोंधळून गेलं.
तेवढ्यात अजितदादांची नजर अभिलाषा रोकडे यांच्याकडे गेली. क्षणात ते थांबले. आवाज बदलला… चेहरा मवाळ झाला… आणि ते म्हणाले,
“तुम्ही रडू नका. त्यांनी चुकीचं काम केलं म्हणून मी थोडा चिडलो आहे. तुमच्यावर नाही.”
त्या एका वाक्याने भीती विरघळली. तो क्षण आजही त्यांच्या मनात जिवंत आहे.
यानंतर सुरू झाली साधी, पण हृदयाला स्पर्श करणारी विचारपूस.
“कुठून आलात?”
“जळगाव,” असे उत्तर मिळताच प्रश्नांची मालिकाच सुरू झाली —
“कशा आलात? कुठे थांबल्या आहात? काही खाल्लं आहे का?”
जेव्हा उत्तर आलं, “अजून काही खाल्लेलं नाही,”
तेव्हा सत्तेच्या शिखरावर असलेल्या त्या नेत्याने क्षणाचाही विलंब न करता सुमित्रा पवार यांना सांगितले,
“आपल्या छोट्या ताईला जेवायला घाला.”
राजकारणात मोठी भाषणं, घोषणा आणि पदं गाजतात.
पण ‘काही खाल्लं आहे का?’ हा प्रश्न अनेक भाषणांपेक्षा मोठा ठरतो.
तो प्रश्न सत्ता नव्हे, तर माणूस बोलतोय… हे दाखवतो.
अजित पवार यांचं नेतृत्व कडक आहे, निर्णय ठाम आहेत;
पण त्या कडकपणाआड दडलेलं संवेदनशील, माणुसकीचं हृदय फार कमी जणांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं.
अभिलाषा रोकडे यांचा हा अनुभव सांगून जातो —
राजकारणातही माणुसकी जिवंत आहे…
फक्त ती ओळखण्याची नजर हवी.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..