जुनाट आजारांवर होमिओपॅथीची नवी आशा ; पाचोरा येथील सुप्रसिद्ध तज्ञ डॉ. अविनाश शर्मा ‘हॅलो डॉक्टर’मध्ये थेट सह्याद्री LIVE


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा :
जुनाट व दीर्घकालीन आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी दिलासादायक आणि मार्गदर्शक ठरणारा विशेष कार्यक्रम दूरदर्शन सह्याद्रीच्या ‘हॅलो डॉक्टर’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पाचोरा शहरातील सुप्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉ. अविनाश शर्मा (M.D.) यांचे थेट सह्याद्री LIVE प्रसारण शनिवार, 31 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे.
या विशेष प्रायोजित कार्यक्रमात होमिओपॅथी व जुनाट आजार या महत्त्वाच्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार असून मधुमेह, सांधेदुखी, दमा, त्वचारोग, पचनसंस्थेचे विकार तसेच दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांमध्ये होमिओपॅथीची भूमिका, उपचारपद्धती व रुग्णांना मिळणारे फायदे याबाबत डॉ. शर्मा थेट संवादातून माहिती देणार आहेत.
पाचोरा येथील गायत्री होमिओपॅथिक क्लिनिकच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वी उपचार करून रुग्णांचा विश्वास संपादन केलेले डॉ. अविनाश शर्मा यांचा अनुभव या कार्यक्रमातून संपूर्ण महाराष्ट्राला लाभणार आहे. आरोग्याविषयी जागृती करणारा हा कार्यक्रम सर्वसामान्य नागरिक, रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
आरोग्याबाबत सजग असणाऱ्या प्रत्येकाने हा कार्यक्रम पाहावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
गायत्री होमिओपॅथिक क्लिनिक
एस.बी. पाटील कॉम्प्लेक्स, जामनेर रोड, पाचोरा
📞 मो. 98227 72109 | ☎️ 02596-240721

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद