"सुवर्ण जयंती नगरोत्थानातून पाचोराच्या विकासाला गती; साई-पार्क कॉलनीतील रस्ते काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन”



राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल 
पाचोरा प्रतिनिधी:
पाचोरा शहराच्या विकासात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेंतर्गत रस्ते विकास प्रकल्पाला सुरुवात होत आहे. पाचोरा नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ९, साई-पार्क कॉलनी परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण कामाचे विधीवत भूमिपूजन रविवार दि. ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था दूर करून नागरिकांना सुरक्षित, टिकाऊ व दर्जेदार वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः साई-पार्क कॉलनी परिसरातील नागरिकांची दीर्घकालीन मागणी या कामामुळे पूर्ण होत असून पावसाळ्यातील चिखल, धूळ व वाहतुकीच्या अडचणींना कायमचा दिलासा मिळणार आहे.
या विकासकामासाठी नगरपरिषद सदस्य सौ. दिपाली किशोर पाटील, नगरपरिषद सदस्य श्री. सुमित किशोर आप्पा पाटील गरनत, उपाध्यक्ष श्री. किशोर गुणवंतराव बारावकर, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुनिता किशोर आप्पा पाटील यांचे विशेष प्रयत्न लाभले आहेत. प्रशासकीय पातळीवर नगरपरिषद अभियंता श्री. भैय्यासाहेब पाटील व मुख्याधिकारी श्री. मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कामाची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे.
सदर रस्ते काँक्रिटीकरणाचे काम मक्तेदार श्री. एम. एस. पी. बिल्डकॉन प्रा. लि., पाचोरा यांच्यामार्फत करण्यात येणार असून गुणवत्तापूर्ण व वेळेत काम पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.
एकूणच, सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाच्या माध्यमातून पाचोरा शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा नगरपरिषदेचा संकल्प या प्रकल्पातून पुन्हा एकदा अधोरेखित होत असून, नागरिकांमध्येही या कामाबाबत समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद