कै.पि.के. शिंदे विद्यालयाची शैक्षणिक सहल शिस्तबद्ध व यशस्वी; शिक्षकवृंदांच्या परिश्रमांना सलाम—प्रवास सुखाचा होवो!



श्री.राजेंद्र खैरनार (9096237788),मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल

पाचोरा प्रतिनिधी:
पाचोरा : कै. पि.के.शिंदे विद्यालय, पुनगाव रोड, पाचोरा येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आज शुक्रवार, दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी पहाटे सकाळी 5 वाजता अत्यंत उत्साहात संभाजीनगर जिल्ह्याकडे रवाना झाली. सहलीचे नियोजन, अंमलबजावणी व विद्यार्थ्यांची सुरक्षितता याबाबत सर्व बाबी काटेकोरपणे पाळण्यात आल्या असून सहल शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीपणे सुरू आहे.
या सहलीत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सोमवंशी सर,श्री हेमंत टोणपे सर, सुशील महाजन सर, श्रीकांत नागणे सर, देशमुख सर, श्री रविराज सोनवणे सर,श्रीमती सुषमा मॅडम तसेच सर्व उपस्थित शिक्षक-शिक्षिका वृंदांनी सकाळपासून अथक परिश्रम घेत विद्यार्थ्यांची संपूर्ण काळजी घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, दौलताबाद किल्ला, भद्रा मारुती मंदिर व वेरूळ लेणी या संभाजीनगर येथील प्रमुख पर्यटन स्थळे व देवस्थाने यांचे दर्शन घेतले. प्रत्येक स्थळी शैक्षणिक माहिती देत विद्यार्थ्यांना इतिहास, संस्कृती व निसर्गाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
सहलीदरम्यान भद्रा मारूती येथे नाश्ता व जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी आनंदात निसर्गाचा अनुभव घेत आहेत. संभाजीनगर येथील सर्व पर्यटन स्थळांचे दर्शन पूर्ण करून सहल सध्या पैठण येथील जायकवाडी धरणाकडे रवाना झाली आहे.
सर्व शिक्षक-शिक्षिका वृंदांच्या नियोजनबद्ध परिश्रमांमुळे ही सहल ज्ञानवर्धक, सुरक्षित व संस्मरणीय ठरत आहे. या शैक्षणिक उपक्रमासाठी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देताना —
शुभेच्छुक :
ज्येष्ठ पत्रकार अनिल आबा येवले – दक्ष पोलीस टाईम प्रतिनिधी
श्री राजेंद्र खैरनार – मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल
खैरनार परिवार, पाचोरा
कै. शिंदे विद्यालयातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे पालक वर्ग
या सर्वांच्या वतीने “सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद यांचा पुढील प्रवास सुखाचा, सुरक्षित व आनंददायी होवो” अशा मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..