मौनातून उमटली शौर्याची आठवण; कोळगाव महाविद्यालयात हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल

कोळगाव — महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार ३० जानेवारी हा हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त कला व विज्ञान महाविद्यालय, कोळगाव येथे स्वातंत्र्यलढ्यातील अमर हुतात्म्यांच्या स्मृतींना नमन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सुरेश आनंदा कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी अकरा वाजता दोन मिनिटांचे मौन पाळून हुतात्म्यांच्या त्यागाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रा. प्रशांत पाटील, प्रा. मनोज पवार, प्रा. तुषार व्ही. पाटील, श्रीमती मनिषा बोरसे, श्री. प्रेमचंद चौधरी, श्री. प्रवीण देसले, पवार मॅडम, केदार मॅडम यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हुतात्म्यांचे बलिदान कधीही विसरता येणार नाही; त्यांच्या विचारांतून राष्ट्रनिष्ठा, देशप्रेम व सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..