आशा सेविकांना सायबर सुरक्षितेबाबत मार्गदर्शन

राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्युज 9096237788

जळगाव : वाढत्या सायबर फसवणुकीपासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आशा सेविकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ जुलै २०२६ रोजी आशा सेविकांसाठी सायबर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात सायबर फसवणुकीचे विविध प्रकार, ओटीपी फ्रॉड, क्यूआर कोड फ्रॉड, ऑनलाइन बँकिंग फसवणूक, एआय व्हॉइस कॉल फ्रॉड, मजबूत पासवर्डचे महत्त्व तसेच टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two-Factor Authentication) याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. मोबाईलचा सुरक्षित वापर, सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करताना घ्यावयाची काळजी आणि संशयास्पद लिंक किंवा कॉलपासून सावध राहण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात स्नेहल पाटील आणि वैष्णवी पाटील यांनी आशा सेविकांना सायबर सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन केले. सत्रादरम्यान उपस्थितांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमास उपस्थित आशा सेविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमामुळे सायबर सुरक्षिततेविषयी जागरूकता वाढण्यास मदत झाली.



Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..