पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ यशस्वी; ५,४०५ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ



राजेंद्र खैरनार | पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्युज 9096237788

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शासनाच्या आदेशानुसार पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघासाठी आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ गुरुवारी (३० जुलै) महाराष्ट्र कृषी विकास महामंडळ (MAIDC), गोडाऊन, पाचोरा येथे उत्साहात पार पडले. या शिबिरात विविध शासकीय विभागांच्या योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला असून एकूण ५,४०५ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर आप्पा पाटील होते. प्रमुख उपस्थितीत प्रांताधिकारी मंगेश देवरे, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, गटविकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

शिबिराच्या प्रारंभी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या शिबिरात महसूल, पंचायत समिती, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, आरोग्य, वन, पुरवठा, नगरपरिषद, महावितरण, पोलीस, शिक्षण, उद्योग, समाजकल्याण, बँका आदी विविध विभागांनी स्टॉल उभारून नागरिकांना योजनांची माहिती देत लाभांचे वितरण केले.

महसूल विभागामार्फत महिलांना शेतकरी दर्जाचे प्रमाणपत्र, जिवंत सातबारा, नांदणी फी अर्ज, घरकुल, फॉर्म-आधारित सेवा, अतिक्रमण अर्ज, उत्पन्न, जाती, रहिवासी प्रमाणपत्रे आदी सेवा देण्यात आल्या. पंचायत समितीमार्फत मनरेगा जॉब कार्ड, पंतप्रधान आवास योजना, जलतारा योजना, सिंचन विहीर, NRLM बँक कर्ज आदींचा लाभ देण्यात आला.

कृषी विभागाने कृषी यांत्रिकीकरण, फळबाग योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, सोलर पंप, अन्न प्रक्रिया उद्योग यांसारख्या योजनांची माहिती व लाभ दिला. पशुसंवर्धन विभागाने शेळी वाटप, आरोग्य विभागाने मातृ वंदना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, बेबी केअर किट, आयुष्मान भारत कार्ड, HPV लसीकरण आदी योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला.

याशिवाय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पुस्तके, गणवेश, शिष्यवृत्ती, सायकल वाटप, महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना, वन विभागाकडून वृक्षलागवड जनजागृती, उद्योग विभागाकडून नवीन शासन निर्णयांची माहिती, तसेच विविध बँकांकडून कर्जविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात पाचोरा व भडगाव तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित हे शिबिर नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी केले, तर सूत्रसंचालन विजय ठाकूर व विनोद धनगर यांनी केले. उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..