गुरु परमेश्वर...गुरुमाऊली...!श्री.गो. से.हायस्कूलला गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्युज
पाचोरा( प्रतिनिधी ) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित,श्री.गो
से.हायस्कूल पाचोरा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षी व्यास यांचे प्रतिमेचे पूजन करून गुरु परमेश्वर.. गुरु माऊली ही भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 
तेजस्विनी सावंत, देवयानी पाटील, कोमल गंडे, चैताली गोसावी, तनश्री पाटील, गौरवी पाटील, खुशी  चौधरी, हर्षदा पाटील, सनी ब्राह्मणे, समर्थ धनगर, आरोही पाटील, स्वरा पाटील, भाग्यश्री खरे या विद्यार्थ्यांनी गुरु विषयी भावना व्यक्त केली. विद्यालयाचे पर्यवेक्षक महेश कौंडिण्य यांनी आपल्या गुरु विषयी मनोगतात विद्यार्थ्यांना पहिले गुरु   आई-वडील असून त्यांचा नेहमी आदर करावा अशी भावना व्यक्त केली.यानंतर ज्येष्ठ शिक्षक एस.एल.वाघ यांनी महर्षी व्यास यांच्याबद्दल आढावा विद्यार्थ्यांसमोर सादर केला. रुपेश पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना गुरु मंत्र आणि गुरूंविषयी सुंदर गीत सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक प्रमुख रवींद्र बोरसे यांनी तर आभार ज्येष्ठ शिक्षक प्रीतमसिंग  पाटील यांनी मानले. व्यासपीठावर मुख्याध्यापक एन.आर.ठाकरे,उपमुख्याध्यापक आर.एल.पाटील, पर्यवेक्षिका अंजली गोहिल,पर्यवेक्षक आर.बी.बांठिया पर्यवेक्षक महेश कौंडिण्य, ज्येष्ठ शिक्षक एस.एल.वाघ, प्रीतमसिंग पाटील, संगीता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..