सायबर सुरक्षा जनजागृती विषयी मार्गदर्शन चर्चा सत्र संपन्न



राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्युज
श्री कृष्ण माध्यमिक विद्यालय, पाचोरा रोड, शेेंदुर्णी, जि. जळगाव येथे इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी दि. ३०/०७/२०२६, गुरुवार, सकाळी ७.०० ते ८.०० वाजेपर्यंत सायबर सुरक्षा जनजागृती विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.

सत्रामध्ये प्रियदर्शनी भांडारकर व खुशबू लांबोळे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.

यामध्ये ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, विशिंग, स्मिशिंग, ओटीपी व पासवर्ड सुरक्षितता, मजबूत पासवर्ड तयार करण्याचे महत्त्व, द्विस्तरीय प्रमाणीकरण (2-Factor Authentication), सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, बनावट लिंक व क्यूआर कोड स्कॅमपासून सावध राहणे, सायबर बुलिंग, डिजिटल गोपनीयता, अज्ञात व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळणे, मोबाईल अॅप्स डाउनलोड करताना घ्यावयाची सुरक्षा काळजी तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचावाचे उपाय याविषयी सविस्तर मार्गदर्शन उपस्थित २५० विद्यार्थ्यांना करण्यात आले.
संवादात्मक पद्धतीने घेण्यात आलेल्या या सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेबाबतची माहिती जाणून घेतली तसेच सुरक्षित डिजिटल जीवनशैलीचा या अभियाना प्रसंगी संकल्प केला.

या चर्चासत्रास श्री कृष्ण माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मीराबाई इंगळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..