भारत विकास परिषद पाचोरा शाखेच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा; अध्यक्षपदी डॉ. संजय जाधव,उपाध्यक्षपदी डाॅ.राहुल झेरवाल, सचिवपदी गोकुळ सोनार
राजेंद्र खैरनार | पाचोरा मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज | 9096237788
पाचोरा (प्रतिनिधी): 'समाजकार्यातून राष्ट्रनिर्माण' हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या भारत विकास परिषदेच्या पाचोरा शाखेला नवचैतन्य देण्यासाठी आयोजित विशेष ऑनलाइन बैठकीत वर्ष २०२६–२७ साठी नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. धुळे येथील प्रांत सचिव श्री. राजेंद्र जाखडी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शाखेच्या विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीनुसार अध्यक्षपदी डॉ. संजय जाधव, उपाध्यक्षपदी डॉ. राहुल झेरवाल, सचिवपदी श्री. गोकुळ सोनार, महिला सहभागिता समन्वयकपदी सौ. पूजा तांबोळी आणि संस्कार समन्वयकपदी श्री. कमलेश सोनवणे यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी समाजहिताच्या विविध उपक्रमांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीस प्रांत सचिव श्री. राजेंद्र जाखडी (धुळे), डॉ. पंकज हरणे, श्री. सतीश जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आगामी वर्षातील कार्ययोजनेवर सविस्तर चर्चा करताना पाचोरा शहरात भारत विकास परिषदेचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नवीन सभासद नोंदणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय संस्कार, सेवा, संपर्क आणि पर्यावरण या चार प्रमुख घटकांवर आधारित विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम वर्षभर राबविण्याचा संकल्प करण्यात आला. पाचोरा शाखेला प्रांतातील आदर्श शाखा म्हणून विकसित करण्यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्य एकजुटीने कार्य करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रप्रेमाची भावना जागृत ठेवत राष्ट्रगीताने बैठकीची सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment