आज लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेत गुरु पौर्णिमा भक्तिभावात साजरी


राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्युज 9096237788

पाचोरा (वार्ताहर): पाचोरा येथील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था येथे गुरु पौर्णिमेचा पवित्र उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आपल्या पाचोरा शहरात गेल्या अनेक वर्षापासून ह भ प सुनीताताई पाटील व योगेश महाराज यांच्या माध्यमातून समाजात एक आध्यात्मिक चैतन्य उभारण्याचे काम चालू आहे त्या माध्यमातून अनेक तरुण व विद्यार्थी हे घडत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी कृतज्ञता म्हणून गुरुच्या पूजनासाठी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले.


कार्यक्रमाची सुरुवात वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार हरिनाम, भजन व संतवाणीने झाली.
कार्यक्रमात परिसरातील आलेल्या सर्व भजनी मंडळांनी आपले भजन सादर केली त्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज तसेच गुरु परंपरेचे पूजन करून उपस्थितांनी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी संस्थेतील विद्यार्थी, वारकरी, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी आपल्या गुरूजनांना व वडीलधाऱ्यांना पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतले. गुरु हे ज्ञान, संस्कार आणि अध्यात्माचे मूर्तिमंत स्वरूप असून त्यांच्या मार्गदर्शनामुळेच जीवनाला योग्य दिशा मिळते, असा संदेश यावेळी देण्यात आला.
या प्रसंगी भागवताचार्य ह.भ.प. योगेशजी महाराज धामणगावकर यांनी गुरु महिमा, संत परंपरा आणि वारकरी संप्रदायातील गुरु-शिष्य नात्याचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी भजन, अभंग व हरिपाठ सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाला परिसरातील पंचक्रोशीतील मोंढाळे पुंनगाव मानकी अंतुरली बांबरुड लोटाहार चिंचखेडे खडकदेवडा पाचोरा शहरातील बाहेर पुरा कृष्णापुरी सिंधी कॉलनी परिसरातील अनेक भाविक व तरुण मंडळी उपस्थित होते आजच्या दिवशी अनेक तरुणांनी माळकरी होऊन आनंदी व समृद्ध जीवन जगण्याचे संकल्प केला
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पाचोरा तालुक्याचे तहसीलदार आदरणीय विजयजी बनसोडे साहेब आदरणीय रमेश जी मोर साहेब दगाजी महाराज बिल्डीकर महादू महाराज मदन महाराज श्रीराम नाना महाजन अशोक आप्पा महाजन भास्कर अण्णा शोभाताई चौधरी आप्पा ओझर येथील ग्रामस्थ तसेच पुंगाव येथील चिंतामण पाटील प्रल्हाद गुजर आधी करून गावातील ग्रामस्थ उपस्थित होते
कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था, पाचोरा यांच्या वतीने उत्कृष्टरीत्या करण्यात आले. गुरु पौर्णिमेचा हा सोहळा भक्तिभाव, संस्कार आणि अध्यात्माची प्रेरणा देणारा ठरला.
कार्यक्रमानंतर संस्थेच्या अध्यक्षा ह भ प सुनीताताई पाटील यांनी उपस्थित यांचे सर्वांचे आभार व्यक्त केले व सर्वांनी असाच आशीर्वाद आपल्या वारकरी भवन वर असू द्या असे साद घातली


Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..