सौ सु गी पाटील विद्यालयाची आषाढी वारी सोहळा

राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्युज 
भडगाव:- येथील जिजाऊ प्राथमिक विद्यालय, सौ सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय व सौ जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भडगाव नगरीतून सजावट पालखीसह काकासट चौक,शनिमंदिर चौक,वाचनालय गल्ली,आझाद चौक,खोलगल्ली,बालाजी गल्ली,या रथमार्गावरून ग्रंथदिंडी,वृक्षदिंडी, न्यानदिंडी व ट्रॅक्टरवर विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत शोभायात्रा काढण्यात आली.यासाठी फलहार युवा उद्योजक भूषण भोसले यांनी उपलब्ध करून दिला.शालेय प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले.या वेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे वेशभूषा करून आनंद लुटला.या सोहळ्यासाठी मुख्याध्यापक/ प्राचार्य अजयजी अहिरे उपमुख्याध्यापिका छाया बिऱ्हाडे व पर्यवेक्षक अशोक तायडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..