Posts

पाचोरा येथे जिल्हास्तरीय रोटरी ओळख सत्र उत्साहात

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्यूज   पाचोरा  रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 आयोजित CROP अर्थात रोटरी ओळखपत्र सेमिनार काल रविवार दिनांक 13 रोजी उत्साहात पार पडला. निर्मल सीड्स पाचोरा येथील  वातानुकूलित सभागृहात आयोजित या क्रॉप सेमिनार ला प्रांतपाल डॉ. राजेश पाटील, निर्मल सिड्सच्या संचालिका वैशालीताई सूर्यवंशी, उपप्रांतपाल हरविंदर थेठी, उप प्रांतपाल भरत सिनकर, रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, सचिव डॉ. स्वप्नील पाटील व सचिव प्रोजेक्ट डॉ. प्रशांत सांगडे, डिस्ट्रिक्ट पदाधिकारी एन्क्लेव्ह सुधीर आबा पाटील, कन्व्हेनर   राजेश मोर व को-कन्वेनर डॉ. मुकेश तेली मंचावर उपस्थित होते.  रोटरी क्लब विषयक परिचय देताना प्रमुख मार्गदर्शक  शशिकांतजी धामणे( चाळीसगाव ),  विरेंद्रजी पाथरीकर( नागपूर ), अमोलजी काबरा (नाशिक), डॉ संदिपजी देशमुख (चाळीसगाव) , डॉ नितीन रेदासनी ( जळगाव) यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी जळगाव ग्रामीण भागातील पारोळा, चोपडा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, चाळीसगाव, भुसावळ, फैजपूर...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचा शहरातून रूट मार्च....! शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची शहरात पायी गस्त; अधिकारी-कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना

Image
राजेंद्र खैरनार  मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज पाचोरा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा शहर व तालुक्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पाचोरा पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातून रूट मार्च काढण्यात आला. पाचोरा पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापू रोहम व पोलीस निरीक्षक श्री. राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च काढण्यात आला. पोलीस स्टेशनपासून सुरुवात झालेला रूट मार्च श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरपालिका, उल्हास टॉकीज रोड, बाहेरपुरा, आठवडे बाजार, रथ गल्ली, गांधी चौक, जामनेर रोड मार्गे पुन्हा पोलीस स्टेशन येथे पोहोचला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापू रोहम यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव काळात शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. नागरिकांनी उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करावा, तसेच कोणत्याही अनुचित प्रकाराला थारा मिळणार नाही, यासाठी पोलिसांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. पोलीस निरीक्षक श्री. राहुल कुमार पवार य...

कै.गणेश कोळी यांच्या स्मृतींना अनोखी मानवंदना; वाढदिवसानिमित्त ३० अनाथ मूकबधिर मुलांना कपडे व भोजन वाटप...कुरंगी येथील कोळी कुटुंबीयांचा स्तुत्य सामाजिक उपक्रम; दुःखाचे रूपांतर सेवाकार्यात करून जपल्या कै. गणेश यांच्या स्मृती*

Image
राजेंद्र खैरनार, पाचोरा | मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज कुरंगी, ता. पाचोरा : कुरंगी येथील रहिवासी ज्ञानेश्वर कोळी यांचा मुलगा कै. गणेश कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त कोळी कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत अनाथ मूकबधिर मुलांसोबत वाढदिवस साजरा केला. पाचोरा तालुक्यातील खेडगाव येथील “किशोर अप्पा पाटील बहुउद्देशी संस्था संचालित निवासी मूकबधिर विद्यालय, खेडगाव” येथे सुमारे ३० अनाथ मूकबधिर मुलांना नवीन कपडे वाटप करण्यात आले तसेच त्यांना प्रेमाने भोजन देण्यात आले. कै. गणेश यांच्या स्मृती सामाजिक सेवेतून जपण्याच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. ज्ञानेश्वर कोळी यांचा मुलगा कै. गणेश कोळी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मेहनत, जिद्द आणि संघर्षाच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन नगर पोलीस म्हणून शासकीय सेवेत प्रवेश मिळविला होता. संघर्षातून उभे राहत शासकीय सेवेत दाखल होण्याचे त्यांचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. मात्र नियुक्तीनंतर अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांना त्रास होऊ लागल्याने ते घरी परतले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच दि. २१ जून २०२६ रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. कै. गणेश...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांची पहाटे धडक; ५५ रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई.....हद्दपार सराईत गुन्हेगार जेरबंद; ११ अजामीनपात्र वॉरंट तामील, अवैध दारूविक्रीवरही धाड*

Image
राजेंद्र खैरनार, पाचोरा  मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज  पाचोरा : आगामी गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावा तसेच शहरासह ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पाचोरा पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पहाटे ३.०० ते ६.३० वाजेपर्यंत पाचोरा शहर व ग्रामीण हद्दीत व्यापक ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांच्या मार्गदर्शनाखाली ५ पोलीस अधिकारी, २५ पोलीस अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. या मोहिमेदरम्यान पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, शरीर व मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल असलेले आरोपी तसेच अवैध धंद्यांशी संबंधित संशयितांच्या ठिकाणी अचानक भेट देऊन तपासणी व झडती घेण्यात आली. ५५ रेकॉर्डवरील आरोपींवर कारवाई कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील तब्बल ५५ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य करू नये, काय...

🌹 दुःखद निधन वार्ता 🌹आण्णासाहेब वसंतराव खंडू गवंदे यांचे दुःखद निधन

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्यशोध न्यूज पाचोरा : दापोरा, ह.मु. पाचोरा येथील सर्वांना सुपरिचित व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व आण्णासाहेब वसंतराव खंडू गवंदे यांचे वयाच्या ७५व्या वर्षी अकस्मात दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने गवंदे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या निधनाबद्दल पाचोरा शहर व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. आण्णासाहेब वसंतराव गवंदे हे प्रेमळ, कर्तव्यनिष्ठ आणि आपुलकीने सर्वांशी वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाने गवंदे परिवाराने एक जिव्हाळ्याचा आधार गमावला आहे. त्यांची अंतिम यात्रा आज दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता गाडगेबाबा नगर, पाचोरा येथील राहत्या घरापासून निघणार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि गवंदे परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण प्रार्थना. शोकाकुल — समस्त गवंदे परिवार, दापोरा व पाचोरा शोकाकुल —  ज्येष्ठ पत्रकार सी. एन. चौधरी सर, प्रा. डॉ. शिवाजी शिंदे सर, अनिल आबा येवले, पत्रकार  राजेंद्र खैरनार, पत्रकार  भोला पाटील‌  सर्व पत्रकार बां...

कै. पि.के.शिंदे माध्यमिक विद्यालयात एचआयव्ही/एड्स जनजागृती व संवेदीकरण अभियान संपन्न

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्युज पाचोरा: येथील कै.पि.के.शिंदे माध्यमिक विद्यालय,पाचोरा येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव यांच्या आदेशानुसार विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. 'Intensified IEC Campaign Activities 2026-27' अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे आयसीटीसी विभागातील  डाॅ. श्रीकांत भोई प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आणि  डॉ. लता चव्हाण  समुपदेशक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या अभियानांतर्गत दोन्ही तज्ज्ञ डॉक्टरांनी शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना किशोरवयीन जीवन कौशल्ये,किशोरवस्थेतील शारीरिक व मानसिक बदल, मानसिक आरोग्य,आणि एचआयव्ही/एड्स व लैंगिक आरोग्याविषयी मूलभूत व वैज्ञानिक माहिती देऊन अत्यंत सोप्या भाषेत संवेदनशील मार्गदर्शन केले. तसेच अंमली व मादक पदार्थांच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.स्वप्निल सांगळे यांच्या निर्देशानुसार संपूर्ण जळगाव जिल्ह्यात १२ ऑग...

🐂🎉 बैलांच्या पूजनातून शेतकरी राजाने जपली कृतज्ञतेची परंपरा; पाचोऱ्यात पोळा सण उत्साहात संपन्न!

Image
राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज तथा दैनिक तोफ पाचोरा तालुका प्रतिनिधी पाचोरा : शेतकऱ्याच्या जीवनातील जिवाभावाचा साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पारंपरिक पोळा सण पाचोरा शहरात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात नुकताच संपन्न झाला. गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा शहर व परिसरात पोळा सणाची परंपरा जपली जात असून यंदाही शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पोळ्यानिमित्त शेतकरी राजाने आपल्या बैलांना विविध रंगांनी सजवून, फुलांचे हार घालून तसेच आकर्षक साजशृंगार करून बैलांची विधिवत पूजा केली. कुटुंबातील सर्व सदस्यांनी बैलांचे औक्षण करून त्यांच्याप्रती असलेली आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर सजविलेल्या बैलांना शहरातून फिरवून पोळ्याचा आनंद साजरा करण्यात आला. कृष्णापुरी भागातील श्री. नाना पाटील यांच्या परिवारातर्फेही बैलांची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी परिसरातील नगरसेवक श्री. अशोक आप्पा पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते लकी पाटील यांनी उपस्थित राहून बैलांचे पूजन केले. यामुळे पाटील परिवाराच्या आनंदात आणखी भर पडली. पोळा ह...

पाचोरा एस.एस.एम.एम. महाविद्यालयात GATE, JAM-2027 कार्यशाळा संपन्न

Image
राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज पाचोरा : येथील एस.एस.एम.एम. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी देशपातळीवरील GATE आणि JAM-2027 या परीक्षांबाबत माहितीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आयआयटी बॉम्बे आणि महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत आयआयटी बॉम्बेचे प्रतिनिधी स्वरूप डोकाटे व प्रदीप कुमार यांनी सादरीकरणाद्वारे GATE व JAM परीक्षांचे स्वरूप, तयारीची दिशा आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध संधी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन व्हा. चेअरमन श्री. व्ही. टी. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील होते, तर समन्वयक म्हणून प्रा. अतुल पाटील यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आसमा तडवी यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. एस. टी. सूर्यवंशी, डॉ. कमलाकर इंगळे, डॉ. श्रावण तडवी, डॉ. योगेश पुरी, प्रा. राजेश वळवी, डॉ. क्रांती सोनवणे, डॉ. शरद पाटील, डॉ. माणिक पाटील, डॉ. शारदा शिरोळे, प्रा. स्वप्निल भोसले, प्र...

*💥🎯🚨 पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारांना अभिवादन; पाचोऱ्यात २३१ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी!**💥🎯🚨प्रतिमा पूजन, पुष्पहार अर्पण व घोषणांनी परिसर दुमदुमला; प्रा. अतुल सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन*

Image
राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज पाचोरा : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २३१ व्या पुण्यतिथीनिमित्त पाचोरा येथील जळगाव चौफुली परिसरात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विविध घोषणा देत पुण्यश्लोक अहिल्यादेवींना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमावेळी प्राध्यापक श्री. अतुल सूर्यवंशी सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा, लोककल्याणकारी विचारांचा आणि समाजहितासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा आढावा घेतला. या कार्यक्रमास धनगर समाज उन्नती मंडळ महाराष्ट्र राज्याचे उपजिल्हाध्यक्ष श्री. किशोरजी पेढारकर, धनगर समाज उन्नती मंडळ पाचोरा शहर अध्यक्ष व माजी शिवसेना नगरसेविका पती बापू हटकर, तसेच सुनील निळे, नामदेव धनगर, धोंडू जिभू, उपाध्यक्ष निवृत्ती हटकर, नाना धनगर, बोरसे मामा, प्रशांत धनगर, विलास पाटील, श्रीराम पाटील, सुनील धनगर, विशाल हटकर, अतुल हटकर, प्रविण हटकर, सचिन हटकर, अश्विन हटकर, आण्णा धनगर, निलेश धनगर यांच्यासह समाजबांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी...

गिरणाई'च्या माजी विद्यार्थ्याची एमपीएससी परीक्षेत बाजी; ललित पाटील यांची 'महसूल सहायक' पदी निवड

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्यूज पाचोरा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित, कै. पि. के. शिंदे माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी चि. ललित लता भाऊराव पाटील याने घवघवीत यश संपादन केले आहे. त्याची महाराष्ट्र शासन, मंत्रालय (मुंबई) येथे 'महसूल सहायक' (Revenue Assistant) पदावर निवड झाली आहे.ललित याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यास करून हे यश खेचून आणले आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशामुळे कै. पि. के. शिंदे माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांनाही यातून स्पर्धा परीक्षांची मोठी प्रेरणा मिळणार आहे.त्याच्या या यशाबद्दल गिरणाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. तात्यासो. पंडितराव शिंदे, मा. श्री. सतिषबापू शिंदे, सचिव मा. ॲड. जे. डी. काटकर, उपाध्यक्ष मा. श्री. निरजभाऊ मुणोत, सहसचिव मा. प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, युवानेते मा. श्री. अमोलभाऊ शिंदे व सर्व पदाधिकारी, विद्यालयाच्या मुख्य...

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबाहेरील कचरा संकलन केंद्र तातडीने हटवा आठ दिवसांत कारवाई न झाल्यास अभाविपचे तीव्र आंदोलन

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्यशोध न्यूज जळगाव : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबाहेरील कचरा संकलन केंद्र मागील अनेक दिवसांपासून सुरू असून, या ठिकाणी साचणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. या दुर्गंधीयुक्त वातावरणाचा थेट परिणाम संस्थेतील विद्यार्थ्यांवर होत असून, विद्यार्थ्यांना दुर्गंधीतच वर्गात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. तसेच याच परिसरात विद्यार्थ्यांना जेवणाचा डबा खावा लागत असल्याने त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शैक्षणिक संस्थेच्या परिसरात स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण असणे आवश्यक असताना संस्थेच्या अगदी बाहेरच कचरा संकलन केंद्र सुरू ठेवण्यात आले आहे. कचऱ्याची नियमित विल्हेवाट आणि परिसराची स्वच्छता याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे महापौर व महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. कचरा संकलन केंद्र तातडीने बंद करून तेथील कचरा हटवावा, परिसराची स्वच्छता करावी तसेच भविष्यात शैक्षणिक संस्थांच्...

🔧जारगाव चौफुलीवर ‘शोएब इंजिनिअरिंग वर्कशॉप’ची नवीन सुरुवात!

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्यशोध न्यूज पाचोरा :-बनोटी रोडवर संघवी ट्रेडिंगसमोर वाहन व मशीनरीच्या विविध कामांची सुविधा जारगाव चौफुली : वाहनधारक व व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी असून, शोएब इंजिनिअरिंग वर्कशॉपने आता आपल्या कामकाजाचा विस्तार करत जारगाव चौफुली, बनोटी रोड, संघवी ट्रेडिंगच्या समोर नवीन ठिकाणी सुरुवात केली आहे. या वर्कशॉपमध्ये वाहन व मशीनरीशी संबंधित विविध प्रकारची इंजिनिअरिंग वर्कशॉपची कामे अनुभवी कारागिरांकडून खात्रीपूर्वक करून दिली जात आहेत. योग्य पद्धतीने व विश्वासार्ह सेवा देण्यावर वर्कशॉपच्या संचालकांकडून भर देण्यात येत आहे. नवीन ठिकाणामुळे परिसरातील वाहनधारकांना इंजिनिअरिंग वर्कशॉपच्या कामांसाठी अधिक सोयीची सुविधा उपलब्ध झाली आहे. ग्राहकांनी एकदा सेवा घेऊन विश्वास ठेवावा, असे आवाहन शोएब इंजिनिअरिंग वर्कशॉपकडून करण्यात आले आहे. संपर्क : 📞 गुलाब दादा – 9860586516 📞 सुपडू दादा – 8830651313 📍 पत्ता : जारगाव चौफुली, बनोटी रोड, संघवी ट्रेडिंगच्या समोर.

शिक्षणातून ज्ञानदान, समाजसेवेतून माणुसकीचा आदर्श; शिक्षिका रुपाली पाटील यांचा शिक्षक दिनी गौरव!

Image
राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज पाचोरा : शिक्षक दिनाचे औचित्य साधून पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षिका सौ. रुपाली पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सौ. रुपाली पाटील या शिक्षिका म्हणून कार्यरत असून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. विशेषतः मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या त्यांच्या कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले. शिक्षक दिनानिमित्त जिल्ह्यातील विविध शिक्षक व शिक्षिकांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात सौ. रुपाली पाटील यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अॅड. श्री. अविनाश भालेराव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. अंकुश कटारे तसेच पाचोरा कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत हा गौरव करण्यात आला. शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान देण्याचे माध्यम नसून वि...

डिजिटल सुरक्षिततेसाठी हॉस्पिटलमध्ये जनजागृती; Anti-Fraud App चे अॅक्टिवेशन

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोधणे जळगाव | प्रतिनिधी डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत नागरिकांना सतर्क करण्यासाठी सारा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल, जळगाव येथे ८ सप्टेंबर रोजी सायबर सिक्युरिटी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात स्टाफ आणि पेशंटना विविध सायबर फ्रॉडबाबत माहिती देण्यात आली. फसवणुकीपासून वाचण्यासाठी आवश्यक खबरदारी, संशयास्पद कॉल्स आणि लिंक ओळखण्याचे मार्ग तसेच सायबर गुन्ह्याची घटना घडल्यास कोणती तातडीची पावले उचलावीत, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमातील महत्त्वाचा भाग म्हणजे Quick Heal Foundation तर्फे विकसित Anti-Fraud App चे अॅक्टिवेशन. उपस्थितांच्या मोबाईलमध्ये अॅप सक्रिय करून त्याचा वापर आणि डिजिटल सुरक्षेसाठी त्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. डॉ. पटेल सर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात सायबर वॉरियर विद्या सोनवणे आणि साक्षी तानाजी पाटील यांनी सक्रिय सहभाग घेत जनजागृती केली. या कार्यक्रमासाठी डॉ. आर. बी. आमले सरांचे मार्गदर्शन लाभले.

श्री.गो.से. हायस्कूल,पाचोरा आयोजित, 'माझा बाप्पा, मातीचा बाप्पा, पर्यावरणाचा रक्षक बाप्पा, कार्यशाळा संपन्न.

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्यशोध न्यूज  पाचोरा( प्रतिनिधी )  श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा या विद्यालयात, दिनांक-08/09/2026, वार मंगळवार रोजी विद्यालयाचे जेष्ठ कलाशिक्षक एस. डी.भिवसने यांनी विद्यार्थ्यांना शाडू माती पासून गणपतीचीं मूर्ती कशा पद्धतीने तयार करायचे याचे मार्गदर्शन केले. व विद्यार्थ्यांना स्वतः ती मूर्ती तयार करून दाखवली. सांस्कृतिक विभाग प्रमुख  आर.बी.बोरसे  यांनी शाडू माती ही नैसर्गिक असते. ही माती पाण्यात लवकर विरघळते त्यामुळे जलप्रदूषण होत नाही. असे आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.या उपक्रमांमधून  विद्यार्थी  केवळ मूर्ती बनवण्याची कला शिकत नाही तर पर्यावरण संरक्षण जलप्रदूषण टाळणे.सर्जनशीलता, स्वावलंबन, श्रम प्रतिष्ठा आणि सामाजिक जबाबदारी याची जाणीव होते . या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे संस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला गेला.       या कार्यशाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एल. पाटील, उपमुख्या...

शाळेत कॉपीमुक्त अभियानांतर्गत मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन

Image
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य  शोध न्युज पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से .हायस्कूल पाचोरा येथे विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजविण्याकरिता आणि परीक्षेविषयीची भीती दूर करण्याकरिता 'कॉपीमुक्त परीक्षा 'या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री आर. एल. पाटील सर, उपमुख्याध्यापक श्री. पी. एम. पाटील सर, पर्यवेक्षक श्री. एम. टी. कौंडिण्य सर, श्री. आर.बी. बांठिया सर,  ज्येष्ठ शिक्षिका सौ. एस. पी. सूर्यवंशी मॅडम, सौ. एस. टी . पाटील मॅडम व्यासपीठावर उपस्थित होते.  शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. आरती पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात सातत्य ठेवून येणाऱ्या परीक्षेत आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासंबंधी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षेस तयार राहावे यासंबंधी सूचना दिल्या. त्याचप्रमाणे स्वतःच्या बुद्धीचा वापर करून मिळवलेले कमी गुण हे कॉपी करून मिळविलेल्या जास्त गुणांपेक्षा कधीही उत्तम असतात हे विविध उदाहरणांद्वारे विद्यार...

बदलत्या वयातील मुलींना जाण-भानाचे धडे; कै. पि. के. शिंदे विद्यालयात विशेष मार्गदर्शन शिबिर

Image
राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज पाचोरा : गिरणाई शिक्षण संस्था, पाचोरा संचलित कै. पि. के. शिंदे माध्यमिक विद्यालय, पाचोरा येथे दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत मुलींसाठी “बदलत्या वयातील जाण-भान” या विषयावर विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शाळेच्या सभागृहात हे शिबिर होणार आहे. किशोरवय हा मुलींच्या आयुष्यातील शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांचा महत्त्वपूर्ण टप्पा असतो. या वयातील बदलांकडे सकारात्मक आणि योग्य दृष्टिकोनातून पाहता यावे, यासाठी शिबिरात विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये शारीरिक व मानसिक बदल, प्रेम आणि आकर्षण यातील योग्य समज, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक, कुटुंब व समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचे भान, तसेच मासिक पाळी व्यवस्थापन आणि व्यायामाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यासोबतच केवळ बाह्य सौंदर्यापेक्षा “बौद्धिक सौंदर्य वाढवा, बुद्धीचा मेकअप करा” हा सकारात्मक संदेश देत मुलींनी आपले शरीर आणि मन अर्थात मेंदू मजबूत व सक्षम कसा ठेवावा, याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. ...