कै. पि.के.शिंदे माध्यमिक विद्यालयात एचआयव्ही/एड्स जनजागृती व संवेदीकरण अभियान संपन्न

राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्युज
पाचोरा:
येथील कै.पि.के.शिंदे माध्यमिक विद्यालय,पाचोरा येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव यांच्या आदेशानुसार विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. 'Intensified IEC Campaign Activities 2026-27' अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे आयसीटीसी विभागातील  डाॅ. श्रीकांत भोई प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आणि  डॉ. लता चव्हाण  समुपदेशक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या अभियानांतर्गत दोन्ही तज्ज्ञ डॉक्टरांनी शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना किशोरवयीन जीवन कौशल्ये,किशोरवस्थेतील शारीरिक व मानसिक बदल, मानसिक आरोग्य,आणि एचआयव्ही/एड्स व लैंगिक आरोग्याविषयी मूलभूत व वैज्ञानिक माहिती देऊन अत्यंत सोप्या भाषेत संवेदनशील मार्गदर्शन केले. तसेच अंमली व मादक पदार्थांच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.स्वप्निल सांगळे यांच्या निर्देशानुसार संपूर्ण जळगाव जिल्ह्यात १२ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हे अभियान राबवले जात आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश किशोरवयीन मुलांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक कलंक किंवा भेदभाव दूर करणे हा आहे.या प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.एस.ताड पर्यवेक्षक श्री.व्ही.पी.देशमुख उपस्थित होते.उपशिक्षक श्री.पी.बी.राठोड यांनी डॉक्टरांचे आभार मानले.कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..