गिरणाई'च्या माजी विद्यार्थ्याची एमपीएससी परीक्षेत बाजी; ललित पाटील यांची 'महसूल सहायक' पदी निवड

राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्यूज
पाचोरा:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित, कै. पि. के. शिंदे माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी चि. ललित लता भाऊराव पाटील याने घवघवीत यश संपादन केले आहे. त्याची महाराष्ट्र शासन, मंत्रालय (मुंबई) येथे 'महसूल सहायक' (Revenue Assistant) पदावर निवड झाली आहे.ललित याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यास करून हे यश खेचून आणले आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशामुळे कै. पि. के. शिंदे माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांनाही यातून स्पर्धा परीक्षांची मोठी प्रेरणा मिळणार आहे.त्याच्या या यशाबद्दल गिरणाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. तात्यासो. पंडितराव शिंदे, मा. श्री. सतिषबापू शिंदे, सचिव मा. ॲड. जे. डी. काटकर, उपाध्यक्ष मा. श्री. निरजभाऊ मुणोत, सहसचिव मा. प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, युवानेते मा. श्री. अमोलभाऊ शिंदे व सर्व पदाधिकारी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. एस. एस. ताड, पर्यवेक्षक श्री. व्ही. पी. देशमुख तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने ललितचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ललितच्या या यशामुळे पाचोरा परिसरातून आणि शैक्षणिक वर्तुळातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..