बदलत्या वयातील मुलींना जाण-भानाचे धडे; कै. पि. के. शिंदे विद्यालयात विशेष मार्गदर्शन शिबिर


राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज

पाचोरा : गिरणाई शिक्षण संस्था, पाचोरा संचलित कै. पि. के. शिंदे माध्यमिक विद्यालय, पाचोरा येथे दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत मुलींसाठी “बदलत्या वयातील जाण-भान” या विषयावर विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शाळेच्या सभागृहात हे शिबिर होणार आहे.

किशोरवय हा मुलींच्या आयुष्यातील शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांचा महत्त्वपूर्ण टप्पा असतो. या वयातील बदलांकडे सकारात्मक आणि योग्य दृष्टिकोनातून पाहता यावे, यासाठी शिबिरात विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यामध्ये शारीरिक व मानसिक बदल, प्रेम आणि आकर्षण यातील योग्य समज, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक, कुटुंब व समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचे भान, तसेच मासिक पाळी व्यवस्थापन आणि व्यायामाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

यासोबतच केवळ बाह्य सौंदर्यापेक्षा “बौद्धिक सौंदर्य वाढवा, बुद्धीचा मेकअप करा” हा सकारात्मक संदेश देत मुलींनी आपले शरीर आणि मन अर्थात मेंदू मजबूत व सक्षम कसा ठेवावा, याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.

बदलत्या वयातील प्रश्न, भावना आणि जबाबदाऱ्या यांची योग्य जाणीव निर्माण करून मुलींमध्ये आत्मविश्वास, निर्णयक्षमता, आरोग्याविषयी जागरूकता आणि सामाजिक भान विकसित करण्याच्या दृष्टीने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या उपक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. ताड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. शाळेतील मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष मार्गदर्शन शिबिरातून किशोरवयीन विद्यार्थिनींना योग्य दिशा व जीवनोपयोगी मार्गदर्शन मिळणार आहे. या उपक्रमाचे. 
सूत्रसंचालन श्रीमती सुषमा पाटील मॅडम, परिचय श्रीमती जे.डी.आहेर मॅडम  व आभार प्रदर्शन सौ विद्या कोतकर मॅडम, या उपक्रमाचे मार्गदर्शन 
 दर्शना सरला अरुण पवार मॅडम यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..