पाचोरा एस.एस.एम.एम. महाविद्यालयात GATE, JAM-2027 कार्यशाळा संपन्न
राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज
पाचोरा : येथील एस.एस.एम.एम. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी देशपातळीवरील GATE आणि JAM-2027 या परीक्षांबाबत माहितीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आयआयटी बॉम्बे आणि महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यशाळेत आयआयटी बॉम्बेचे प्रतिनिधी स्वरूप डोकाटे व प्रदीप कुमार यांनी सादरीकरणाद्वारे GATE व JAM परीक्षांचे स्वरूप, तयारीची दिशा आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध संधी याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे उद्घाटन व्हा. चेअरमन श्री. व्ही. टी. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील होते, तर समन्वयक म्हणून प्रा. अतुल पाटील यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आसमा तडवी यांनी केले.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. एस. टी. सूर्यवंशी, डॉ. कमलाकर इंगळे, डॉ. श्रावण तडवी, डॉ. योगेश पुरी, प्रा. राजेश वळवी, डॉ. क्रांती सोनवणे, डॉ. शरद पाटील, डॉ. माणिक पाटील, डॉ. शारदा शिरोळे, प्रा. स्वप्निल भोसले, प्रा. शुभम राजपूत, डॉ. प्रदीप रुद्रसवाड, प्रा. अमित गायकवाड, डॉ. प्राजक्ता देशमुख, डॉ. प्राजक्ता शितोळे, डॉ. मेघा मराठे, प्रा. संदीप द्राक्षे, डॉ. राहुल गरुड, प्रा. सागर पाटील, प्रा. प्रियंका पाटील, प्रा. अक्षय शेंडे, सुनील नवगिरे, बी. जे. पवार, ज्योती जाधव, सुरेंद्र तांबे, जय कुमावत यांनी प्रयत्न केले.
यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment