पाचोरा येथे जिल्हास्तरीय रोटरी ओळख सत्र उत्साहात

राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्यूज 
 पाचोरा  रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 आयोजित CROP अर्थात रोटरी ओळखपत्र सेमिनार काल रविवार दिनांक 13 रोजी उत्साहात पार पडला. निर्मल सीड्स पाचोरा येथील  वातानुकूलित सभागृहात आयोजित या क्रॉप सेमिनार ला प्रांतपाल डॉ. राजेश पाटील, निर्मल सिड्सच्या संचालिका वैशालीताई सूर्यवंशी, उपप्रांतपाल हरविंदर थेठी, उप प्रांतपाल भरत सिनकर, रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, सचिव डॉ. स्वप्नील पाटील व सचिव प्रोजेक्ट डॉ. प्रशांत सांगडे, डिस्ट्रिक्ट पदाधिकारी एन्क्लेव्ह सुधीर आबा पाटील, कन्व्हेनर   राजेश मोर व को-कन्वेनर डॉ. मुकेश तेली मंचावर उपस्थित होते.
 रोटरी क्लब विषयक परिचय देताना प्रमुख मार्गदर्शक  शशिकांतजी धामणे( चाळीसगाव ),  विरेंद्रजी पाथरीकर( नागपूर ), अमोलजी काबरा (नाशिक), डॉ संदिपजी देशमुख (चाळीसगाव) , डॉ नितीन रेदासनी ( जळगाव) यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी जळगाव ग्रामीण भागातील पारोळा, चोपडा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, चाळीसगाव, भुसावळ, फैजपूर, पाचोरा भडगाव येथील 75 रोटरी सदस्य उपस्थित होते.
 प्राध्यापक सी. एन. चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ.  मुकेश तेली यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निर्मल सीड्स चे अधिकारी, कर्मचारी यांचे सह  रोटरी क्लब पाचोरा भडगाव येथील सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..