श्री.गो.से. हायस्कूल,पाचोरा आयोजित, 'माझा बाप्पा, मातीचा बाप्पा, पर्यावरणाचा रक्षक बाप्पा, कार्यशाळा संपन्न.
पाचोरा( प्रतिनिधी )
श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा या विद्यालयात, दिनांक-08/09/2026, वार मंगळवार रोजी विद्यालयाचे जेष्ठ कलाशिक्षक एस. डी.भिवसने यांनी विद्यार्थ्यांना शाडू माती पासून गणपतीचीं मूर्ती कशा पद्धतीने तयार करायचे याचे मार्गदर्शन केले. व विद्यार्थ्यांना स्वतः ती मूर्ती तयार करून दाखवली. सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.बी.बोरसे यांनी शाडू माती ही नैसर्गिक असते. ही माती पाण्यात लवकर विरघळते त्यामुळे जलप्रदूषण होत नाही. असे आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.या उपक्रमांमधून विद्यार्थी केवळ मूर्ती बनवण्याची कला शिकत नाही तर पर्यावरण संरक्षण जलप्रदूषण टाळणे.सर्जनशीलता, स्वावलंबन, श्रम प्रतिष्ठा आणि सामाजिक जबाबदारी याची जाणीव होते . या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे संस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला गेला.
या कार्यशाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एल. पाटील, उपमुख्याध्यापक पी. एम. पाटील पर्यवेक्षिका अंजली गोहिल , क्रीडा प्रमुख एस.पी.करंदे, कलाशिक्षक सुबोध कांतायन, प्रमोद पाटील, कलाशिक्षिका ज्योती पाटील तसेच संगीता पाटील, यांच्या उपस्थितीत हा उपक्रम संपन्न झाला.
Comments
Post a Comment