गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचा शहरातून रूट मार्च....! शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची शहरात पायी गस्त; अधिकारी-कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज

पाचोरा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा शहर व तालुक्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पाचोरा पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातून रूट मार्च काढण्यात आला.
पाचोरा पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापू रोहम व पोलीस निरीक्षक श्री. राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च काढण्यात आला. पोलीस स्टेशनपासून सुरुवात झालेला रूट मार्च श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरपालिका, उल्हास टॉकीज रोड, बाहेरपुरा, आठवडे बाजार, रथ गल्ली, गांधी चौक, जामनेर रोड मार्गे पुन्हा पोलीस स्टेशन येथे पोहोचला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापू रोहम यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव काळात शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. नागरिकांनी उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करावा, तसेच कोणत्याही अनुचित प्रकाराला थारा मिळणार नाही, यासाठी पोलिसांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पोलीस निरीक्षक श्री. राहुल कुमार पवार यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड तसेच महिला होमगार्ड यांना योग्य सूचना देत संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्याचे आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश दिले.

या रूट मार्चमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक श्री. योगेश गणगे, पोलीस उपनिरीक्षक श्री. कृष्णा घायाळ, पोलीस उपनिरीक्षक श्री. कैलास ठाकूर यांच्यासह पाचोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी, होमगार्ड व महिला होमगार्ड पथक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवावा, असे आवाहन पाचोरा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..