शिक्षणातून ज्ञानदान, समाजसेवेतून माणुसकीचा आदर्श; शिक्षिका रुपाली पाटील यांचा शिक्षक दिनी गौरव!
राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज
पाचोरा : शिक्षक दिनाचे औचित्य साधून पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षिका सौ. रुपाली पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सौ. रुपाली पाटील या शिक्षिका म्हणून कार्यरत असून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. विशेषतः मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या त्यांच्या कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले.
शिक्षक दिनानिमित्त जिल्ह्यातील विविध शिक्षक व शिक्षिकांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात सौ. रुपाली पाटील यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अॅड. श्री. अविनाश भालेराव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. अंकुश कटारे तसेच पाचोरा कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत हा गौरव करण्यात आला.
शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान देण्याचे माध्यम नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे प्रभावी साधन आहे. या भावनेतून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करणाऱ्या सौ. रुपाली पाटील यांच्या कार्याचा शिक्षक दिनी झालेला सन्मान हा त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाला मिळालेली कौतुकाची पावती ठरला आहे.
यावेळी जिल्ह्यातील विविध शिक्षक-शिक्षिकांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शिक्षकांच्या कार्याचा गौरव म्हणजे ज्ञान, संस्कार आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठीच्या योगदानाचा सन्मान, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
Comments
Post a Comment