बकरी ईद निमित्त ईदगाह दर्गा परिसरात उत्साहपूर्ण वातावरण; पाचोरा पोलिसांचा चोख बंदोबस्त, मुस्लिम बांधवांना मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव...!

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक : सत्य शोध‌ न्यूज
पाचोरा प्रतिनिधी :पाचोरा येथील मानसिंगा बिल्डिंग जवळ असलेल्या ईदगाह दर्गा (मज्जिद) येथे बकरी ईद निमित्त हजारो मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात नमाज पठण केले. सकाळपासूनच ईदगाह परिसरात भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील विविध भागातून मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून शांतता, बंधुभाव आणि समाजातील ऐक्यासाठी प्रार्थना केली.
नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांना उपविभागीय पोलीस अधिकारी डी.वाय.एस.पी. श्री बापू रोहम साहेब तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पवार यांनी बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व धर्मीयांमध्ये बंधुभाव, शांतता आणि सौहार्द कायम राहावे, असा संदेश मान्यवरांनी दिला.
या प्रसंगी नगरसेवक श्री अशोक आप्पा पाटील, श्री रसूल शेठ, श्री नशीर बागवान, सामाजिक कार्यकर्ते हरून देशमुख, डॉ.आलम देशमुख तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते इरफान मणियार ,जेष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे संपूर्ण धार्मिक कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..