“10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी एम एम महाविद्यालयाची विशेष मदत"


राजेंद्र खैरनार

मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल

पाचोरा येथील एम एम कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (सन 2026-27) सुलभ व्हावी यासाठी विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 21 मे व 22 मे 2026 या दोन दिवसांत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयामार्फत मोफत मार्गदर्शन व सुविधा देण्यात येणार आहे.

विद्यार्थी व पालकांची गैरसोय टाळण्यासाठी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर लॅबमध्ये ऑनलाईन अर्जाचा भाग 1 तसेच भाग 2 (महाविद्यालय पसंती क्रम भरणे) ही प्रक्रिया पूर्ण करून दिली जाणार आहे.

बोर्डाकडून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा दिनांक 21/05/2026 ते 22/05/2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार असून, महाविद्यालयात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सुविधा दिली जाणार आहे.

📍 ठिकाण

कॉम्प्युटर लॅब, प्राचार्य केबिनच्या वर,
एम एम महाविद्यालय, पाचोरा

📌 आवश्यक सूचना

👉 विद्यार्थ्यांनी 10 वी मार्कशीटची ऑनलाईन प्रिंट सोबत आणावी.
👉 आधार कार्ड, पासपोर्ट फोटो तसेच आवश्यक असल्यास जात प्रमाणपत्र (Caste Certificate) आणणे बंधनकारक आहे.
👉 विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

विद्यार्थ्यांनी व पालकांनी या सुविधेचा लाभ घेऊन 11 वी प्रवेश प्रक्रिया अडचणीविना पूर्ण करावी, असे आवाहन एम एम कनिष्ठ महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..