बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनच्या सोळाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सत्यपाल महाराजांच्या भव्य कीर्तनाच्या कार्यक्रमात मोठा बदल; आता २ जून रोजी होणार आयोजन


राजेंद्र खैरनार(पाचोरा)मुख्य संपादक – सत्य शोध न्यूज
पाचोरा : शहरातील दसेरा मैदानावर बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, पाचोरा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कीर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच संस्थापक अध्यक्ष श्री. हरिभाऊ तुकाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित समाज प्रबोधनकार ह.भ.प. श्री. सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पूर्वनियोजित दिनांक २९ मे २०२६ ऐवजी आता दिनांक ०२ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

हा भव्य कीर्तन सोहळा मंगळवार दिनांक ०२ जून २०२६ रोजी सायंकाळी ठीक ७:०० वाजता दसेरा मैदान, जामनेर रोड, पाचोरा येथे संपन्न होणार आहे. काही अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमाच्या तारखेमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

समाज प्रबोधन, अध्यात्म आणि सत्यवाणीच्या माध्यमातून जनजागृती करणारे ह.भ.प. श्री. सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाला पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या प्रभावी वाणीमुळे समाजात सकारात्मक विचारांची प्रेरणा निर्माण होत असून युवकांमध्येही विशेष उत्साहाचे वातावरण आहे.

बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनच्या वतीने सर्व भाविक भक्तांना या दिव्य कीर्तन सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कार्यक्रमाच्या बदललेल्या तारखेची नोंद घेऊन नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती आयोजकांनी केली आहे.

— बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, पाचोरा

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..