“२० मे रोजी पाचोरा शहरातील मेडिकल १०० टक्के बंद; विविध मागण्यांसाठी औषध विक्रेत्यांचा एल्गार”

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
दि.२० मे रोजी “ऑल इंडिया केमिस्ट बंद”च्या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरातील सर्व मेडिकल दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. पाचोरा मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली औषध विक्रेत्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी एकजुटीने आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले.

या बंदला शहरातील मेडिकल व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १०० टक्के सहभाग नोंदविला. औषध व्यवसायाशी संबंधित विविध समस्या, वाढत्या अडचणी तसेच व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्र व राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

यावेळी पाचोरा Medical Association चे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व औषध विक्रेते उपस्थित होते. आंदोलनादरम्यान शिष्टमंडळाने आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांचे प्रतिनिधी श्री राजेश पाटील यांची भेट घेत निवेदन सादर केले.

सदर निवेदनात औषध विक्रेत्यांच्या विविध मागण्या केंद्र व राज्य स्तरावर तातडीने मार्गी लावण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच भविष्यात व्यापारी वर्गाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.

पाचोरा शहरातील मेडिकल व्यावसायिकांनी दाखविलेली एकजूट आणि शिस्तबद्ध बंदमुळे हा विषय शहरभर चर्चेचा ठरला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद