महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा-पाचोरा जि.जळगाव आयोजित माजी न्यायाधीश दयाराम कोळी यांच्या"बोभाटा" या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा)महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा पाचोरा यांच्या वतीने दि. 23 फेब्रु.2025 रविवारी सकाळी 10:00 वा.एम.एम.एस.एस. महाविद्यालय पाचोरा येथे माजी न्यायाधीश दयाराम कोळी लिखित "बोभाटा" या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा हा मोठ्या संख्येने उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पाचोरा शाखेचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार तथा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.दिलीप (भाऊ)ओंकार वाघ उपस्थित होते. त्यांनी आपल्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन केले.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते. यात . पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चे.मा.संजय(नानासाहेब )ओंकार वाघ, व्हा.चे.नानासाहेब व्ही.टी. जोशी, प्रा.डॉ. वासुदेव वले (कार्याध्यक्ष, म.सा.प., पाचोरा), डॉ. अशोक कौतिक कोळी (जामनेर), प्रा. डॉ. शिवसांब कापसे (उप-प्राचार्य, श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालय, पूर्णा), सहाय्यक धर्मादाय आयुक्त सौ. वर्षा बिरहारी चोंडे (सांगली), मा. श्री. मंगेश बिरहारी (दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, नागपूर), मा. सौ. स्वाती भास्कर सुर्यधन, मा. सौ. मंगला दयाराम कोळी, दगाजीआप्पा वाघ आणि सतीश उर्फ चौधरी यांचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या स्वागत व सत्काराने झाली. विशेष म्हणजे, स्वागत व सत्काराने झाली.या प्रकाशन सोहळ्यामध्ये काव्यसंग्रहाचे लेखक मा. न्यायाधीश दयाराम कोळी आणि त्यांची पत्नी सौ.मंगला कोळी यांचा विशेष सत्कार माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर पाचोरा वकील संघाच्या तर्फे कोळी दांपत्याचा गौरव करण्यात आला. वकील संघाचे अध्यक्ष ॲड.प्रविण पाटील, ॲड.एस.पी. पाटील, ॲड. मानसिंग सिद्धू, ॲड.अजय अहिरे, ॲड.शांतीलाल सैदाणे, ॲड. हरीभाऊ सपकाळे, ॲड. रविंद्र सपकाळे यांच्यासह अनेक वकील मंडळी याप्रसंगी उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.वासुदेव वले यांनी केले. त्यानंतर कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठाचा आणि विशेष फलकाचा अनावरण समारंभ आलेल्या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. पुस्तक प्रकाशनानंतर लेखक दयाराम कोळी यांनी आपल्या मनोगतातून 'बोभाटा' काव्यसंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा उलगडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा कवितासंग्रह 1990 ते 2000 या दोन पंचवार्षिकमधील सामाजिक परिस्थितीवर भाष्य करतो. 'बोभाटा' हा तावडी बोलीभाषेतील काव्यसंग्रह आहे, जो विशेष म्हणजे पाचोरा, जामनेर तसेच मलकापूर या भागांत प्रचलित आहे. दयाराम कोळी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "लेखक, कवी, बुद्धिजीवी वर्ग आणि साहित्यिकांवर समाज प्रबोधनाची महा जबाबदारी असते. समाजाला योग्य दिशा देणे हे आमचे कर्तव्य आहे. माझा जन्म पाचोरा तालुक्यामधील बांबरुड (राणीचे) या खेडेगावात झाला. लहानपणापासून शेती व्यवसायाच्या सुख-दुखांचा अनुभव घेतला. शेतकऱ्यांचे ओला-दुष्काळ, गारपीट, शासनाच्या धोरणांमुळे होणारे तोटे, निर्यात-आयातीचे संभाव्य परिणाम यांचे साक्षीदार राहिलो. या साऱ्या वेदनांना कवितेमधुन अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे." 'बोभाटा' मधील कविता साधारण माणसांच्या वेदनांचे हुबेहूब प्रतिबिंब आहे. 'शाळेत जायची का मले हाऊस नाही?' या कवितेतून एका दीन होतकरू शेतकऱ्याच्या मुलाच्या मनातील व्यथा मांडली आहे. तसेच मुंबईतील सर्वसाधारण माणसाचे दैनंदिन जीवनपट 'मुंब्रा अन वांद्रयाचे मिलन' या कवितेतून प्रभावीपणे मांडले आहे. गारपीट झाल्यावर स्थगित होणाऱ्या लग्नाची व्यथा सांगणारी कविता – 'आभाळाच उभं फाटलं, सके टाके मारणे जमणार नाही' - अत्यंत हृदय ला स्पर्श करणारी आहे. याशिवाय, 'फिर्याद' कवितेत पोलीस खात्याची परीस्थिती स्पष्ट केली आहे. 'बोभाटा' काव्यसंग्रहातील भरपूर कविता सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय बाबींवर भाष्य करणाऱ्या आहेत. विशेषतः कोल्हापुरी बंधाऱ्याच्या संदर्भातील भ्रष्टाचाराचे विनोदी अंगाने सादरीकरण करणारी कविता विशेष करून प्रसिद्ध झाली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रकाशक अनुराधा पब्लिकेशन, नांदेड यांचे आभार व्यक्त करण्यात आले. प्रा. डॉ. सुनिता मांडोळे यांनी कार्यक्रमाचे छान सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी निवृत्त न्या. तथा काव्यसंग्रह लेखक मा.दयाराम कोळी यांचे सुपुत्र मंगेश बिरहारी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच सहभागी रसिकांचे मनाने व शब्द सुमनांनी आभार मानले.
हा प्रकाशन सोहळा साहित्य प्रेमींसाठी एक वरदान ठरला आहे. "बोभाटा" या काव्यसंग्रहाने समाजातील विविध पातळीवर भावभावना कवितेच्या माध्यमातून प्रभावीपणे व्यक्त झाल्या आहेत. या प्रकाशन सोहळ्यामुळे पाचोरा शहरामधील साहित्य क्षेत्राला एक नवी उर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे.
Comments
Post a Comment