पातोंडा येथे खंडेराव महाराज यात्रानिमित्त खंडेराव केसरी कुस्त्यांची दंगल उत्साहात
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पातोंडा ता . चाळीसगांव जि जळगांव येथे संपुर्ण गावाचे ग्रामदैवत गावाच्या दक्षिणेला तितुर नदीच्या काठावर वसलेले पुरातत्व असे खंडेरावाचे मंदीर दरसालाबादाप्रमाणे यात्रा संपूर्ण गावाच्या लोक वर्गणीतून उत्सहात साजरी करण्यात येते यात तमाशा किर्तन आणि अखेरचा कुस्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो दरसालाबादाप्रमाणे प्रत्येक समाजातील माणसाला यात्राकमेटीचा मान दिला जातो यावर्षी झगडे कुटुंबातील छोटू झगडे यांना यात्राकमेटी चा मान दिला गेला यात्रेत कुस्त्यांसाठी गावातील त्रिमुती केसरी ज्ञानेश्वर साहेबराव महाजन/. नाना पैलवान हे गावातील मुलांना मल्लविद्या देवून कुस्ती खेळतात त्यांना वस्तात म्हणतात वस्तात रंगीबेरंगी डाव या शिष्यांना देत असतात आपला शिष्य पारंगत झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो *देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे* अशी विद्या ज्ञानेश्वर साहेबराव महाजन यांनी आपल्या पठ्यांना दिली या खंडेराव महाराज केसरी कुस्ती मल्लविद्या त नाना पैलवान यांचे 4 मुले सोनु महाजन ईश्वर देवरे अजय गायकवाड रोहित पाटील यांनी खेडेराव यात्रेत मानाची कुस्ती खेळून 11 पैकी 4 केसरी गदा मानाच्या कुस्तीत घनघवीत यश संपादन केले या चार पैलवानांची गावात
भव्यदिव्य मिरवणुक काढण्यात आली ज्ञानेश्वर साहेबराव महाजन यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला पुढील भावी काळात त्यांना ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या या कुस्तीगीर अनेक गावाचे पैलवान उपस्थित होते गावाचे सरपंच काशिनाथ भाऊ शिरसाठ उपसरपंच विश्वास नाना आबा पैलवान पिंटू मराठे कल्पेश माळी भैय्या सुभाष माळी सुभाष भाऊ गरीब साम्राज्य अमोल सोनार पठाण दादा संजय भास्कर पाटील अक्षय पाटील महेश सावळकर बापू महाराज पैलवान पोलिस प्रशासन संपूर्ण गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment