पहाट फाऊंडेशन च्या वतीने बांबरुड (राणिचे) येथील युवकांला "आदर्श शेतकरी " पुरस्काराने केले सन्मानित ...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पहाट फाऊंडेशन च्या वतीने बांबरुड (राणिचे) येथील युवकांला "आदर्श शेतकरी " पुरस्काराने केले सन्मानित ...! 

पहाट फाऊंडेशन च्या वतीने बांबरुड (राणिचे) येथील किरण अशोक सुर्यवंशी यांना राष्ट्रसंत गाडगे बाबा राज्यस्तरीय आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित केले. 

बांबरुड राणिचे (ता.पाचोरा)ता.२४ पाचोरा तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथील किरण अशोक सुर्यवंशी यांनी नोकरी च्या मागे न लागता शेती करण्यावर भर दिला. शेतीची आवड असल्याने किरण अशोक सुर्यवंशी यांची नेहमीच विविध प्रयोग करून त्यांनी विविध पिकांचे अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असून.कला शाखेतील पदवी व डी. एड  शिक्षण असलेल्या या युवकांने शेतीत राबविलेले अनेक प्रयोग यशस्वी केले आहे.किरण च्या वडीलांचे सांगने आहे की "नोकर न बनता ,मालक बना" हे उदिष्ट डोळ्यासमोर ठेऊन किरण अशोक सुर्यवंशी हा शेती क्षेत्रात  प्रयत्नशील  आहेत.
 
किरण अशोक सुर्यवंशी यांच्या कार्याची दखल घेऊन पहाट फाऊंडेशन तर्फे त्यांना दि. २३ फेब्रुवारी रोजी ग्रामसंत राष्ट्रसंत गाडगे बाबा यांचे जयंतीनिमित्त राष्ट्रसंत गाडगे बाबा राज्यस्तरीय आदर्श  शेतकरी पुरस्काराने मा.आदर्श सरपंच भास्कर दादा पेरे पाटील(आदर्श ग्राम पंचायत पाटोदा)  यांच्या उपस्थितीत मा.आमदार श्री संजय कुटे (माजी मंत्री तथा आमदार जळगाव जामोद) यांच्या हस्ते शेगांव येथे सन्मानित करण्यात आले.
 
याप्रसंगी मा. आमदार श्री संजय कुटे ( माजी आमदार जळगाव जामोद)  मा. प्रशांत पाटील तहसीलदार जि. बुलढाणा,मा.भाऊ भोजने (सामाजिक कार्यकर्ते)मा.प्रा.डॉ संजय गायकवाड (साहित्यिक व व्याख्याते) प्रा. डॉ.आर एन. गावित (डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्राचार्य) मा. श्वेता परदेशी (मिसेस इंडिया विजेता)पहाट फाऊंडेशन चे संचालक अमोल भिंलगे अर्पिता सुरक्षा संचलिका पहाट फाऊंडेशन  व इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद