जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल सावंत सर यांना महाराष्ट्र फाउंडेशन पुणे यांच्याकडून राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर*

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
आज दिनांक 28 रोजी महाराष्ट्र फाउंडेशन पुणे या संस्थेकडून राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल सावंत सर यांना जाहीर झाला असून सदरचा पुरस्कार हा विविध मान्यवरांच्या हस्ते पुणे येथील आळंदीला देण्यात येणार आहे 
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल सावंत सर हे गेले अनेक दशकापासून चर्मकार समाजात उल्लेखनीय कार्य करत असतात ते आज विविध संघटनेत देखील काम करत असून त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, तसेच पत्रकारिता या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना हा पुरस्कार मिळणे म्हणजेच एक मानाचा तुरा समाजात रोवला गेला असून ते आज विविध क्षेत्रातील सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात मालन वसतिगृह पाचोरा येथे अधीक्षकपदावर , तसेच सहकार क्षेत्रात संचालक म्हणून दादासाहेब गजमल को-ऑप बँकेत अनेक वर्षे होते व पत्रकारिता मध्ये अनेक वृत्तपत्र मध्ये काम करून आजमितीला स्वतः झटपट लाईव्ह न्यूज च्या माध्यमातून संपादक म्हणून काम पाहतात ते गाळण बु ग्रामपंचायत मध्ये माजी सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे 
त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, तसेच पत्रकार, व सहकार क्षेत्रातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद