एन मुक्ता तर्फे पंच परिवर्तन या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा तोरणमाळ येथे संपन्न..तोरणमाळ येथे संपूर्ण खानदेशातील विद्वानांनी केले पर्यावरणावर मंथन..
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
दोन दिवसीय कार्यशाळेत बौद्धिक सत्र विविध खेळ व मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यातून घेतला सर्व प्राध्यापकांनी आणि प्राचार्यांनी आनंद..
भडगाव प्रतिनिधी ( प्रा सुरेश कोळी )
नवापूर येथे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संचालित नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँड काॅलेज टीचर्स असोसिएशन (एन-मुक्ता) या संघटनेतर्फे नुकतेच दोन दिवसीय पर्यावरण या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. उद्घाटन सत्रानंतर या कार्यशाळेमध्ये राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य कबचौ उमवी रामसिंग दादा वळवी यांनी जैवविविधता या विषयावर मांडणी करून रानभाज्या तसेच आदिवासी भागातील विविध भाज्यांचे प्रकार त्यावर केलेली कामगिरी यावर प्रकाश टाकला. सायंकाळी सर्व प्राध्यापकांनी पारंपारिक खेळांचा आनंद लुटला. दुसऱ्या दिवशी सकाळी डाॅ.योगेश नांद्रे यांनी योग सत्र घेतले नंतर पहिल्या सत्रात प्राचार्य डॉ व्ही. आर. पाटील यांनी घन जंगल (मियावाकी) व त्याचे महत्त्व सांगितलं .दुसऱ्या सत्रात डॉ. दहातोंडे यांनी शेती व पर्यावरण हा विषय मांडला. तसेच पुढील सत्रात विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य डॉ शिवाजी राव पाटील यांनी ग्लोबल वार्मिंग विषय मांडून पर्यावरणाचे महत्त्व विषद केलं. डॉ.कांचन महाजन यांनी पर्यावरण व आरोग्य याचे महत्त्व विषद केले. शेवटच्या सत्रात डॉ एस के शेलार यांनी पर्यावरण व खगोलीय बदल हा विषय मांडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन मुक्ता संघटनेचे सचिव डॉ. पवन पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष एन-मुक्ताचे अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन बारी यांनी एकंदरीतच पंचपरिवर्तन व त्याचे आपल्या आयुष्यातील महत्त्व याची माहिती विशद केले. या कार्यक्रमाला कबचौ उमवीचे व्य.प .सदस्य डॉ. शिवाजी पाटील, अधीसभा सदस्य डॉ. गजानन पाटील,प्राचार्य डॉ.एस आर पाटील, विद्या परिषद सदस्य डॉ. मनोज चोपडा, डॉ.एस के शेलार, डॉ. भूषण कवीमंडन,विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. जयेंद्र लेकुरवाळे पूर्णवेळ हजर होते. कार्यक्रमाच्या नियोजनात डॉ अनिल बेलदार, डॉ. अनिल साळुंखे, डॉ. भरत चाळशे, डॉ. शेखर वाणी,डॉ. सुनील बावणे, डॉ. हरेश चौधरी डॉ.विष्णू हुसे, डॉ.विजेता सिंग यांनी परिश्रम घेतले. या कार्य शाळेसाठी विद्यापीठ परिक्षेत्रा तील एकूण 78 प्राध्यापक हजर होते. रात्रीच्या चांदण्यात सांस्कृतिक कार्यक्रमात सर्व प्राध्यापकांनी आपापल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात आपल्या तील विविध गुण दाखवले. यात गीत गायन एकपात्री अभिनय नृत्य अशा विविध कलाविष्कारां चा प्राध्यापकांनी अविष्कार केला. यात प्रा.डाॅ.नितीन माळी यांचा जीवन म्हणजे काय हा सादर एकपात्री अभिनय सर्व प्राध्यापकांसाठी लक्षवेधी ठरला. या दोन दिवशीय कार्यशाळेत विविध सत्रात संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पाहुण्यांचा परिचय आणि आभार प्रदर्शन डॉ जगदीश काळे डॉ.नितीनकुमार माळी, प्रा. आर.बी.पाटील, डॉ. नलिनी पाटील, डॉ. कुणाल गायकवाड डॉ.अजय पाटील, प्राचार्य डॉ.सुनील कुवर, डाॅ. नरेंद्र पाठक, डाॅ. जी.पी. बोरसे, डॉ.अनिल बारी,डॉ. विजय बाविस्कर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संजय शिंगाने, डॉ. योगेश पाटील डॉ. अहिरराव, डॉ अनिल शिंदे, डॉ. स्वप्निल वाणी डॉ.अर्चना वनीकर, डॉ. योगेश मोरे डॉ. आर बी पाटील डॉ.सुनील शिंदे, डाॅ.हरिभाऊ पवार, राठोड डॉ.विठ्ठल जाधव, प्रा.प्रणव गरूड, डाॅ.मनिषा वर्मा, डाॅ.सुनिल पाटील, डाॅ. एस.एन. साळुंखे,यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment