भडगाव शहरातील बाळद रोडवरील मोटर सायकल चोरी प्रकरणी एक आरोपी भडगाव पोलिसांच्या ताब्यात... दोन मोटर सायकल जप्त...!
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
भडगाव तालुक्यातुन तसेच शहरामधुन गेल्या काही दिवसांपासून भरपूर दुचाकी चोरीला जात आहेत. याविषयी भडगाव पोलिस प्रशासनाने वडजी येथील एका तरुणाला मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेली असून या दुचाकी चोराकडून 2 मोटारसायकली जप्त करण्यात भडगाव पोलिसांना यश आले आहे.
(शब्दांकन: राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल) पाचोरा (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभात एक अनोखा आणि अविस्मरणीय योगायोग पाहायला मिळाला. शिक्षण क्षेत्रातील सर्वगुणसंपन्न प्राध्यापिका सौ. वर्मा मॅडम आणि पोलिस प्रशासनातील कर्तव्यदक्ष, धाडसी “सिंघम लेडीज” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सौ. वर्मा मॅडम यांचा एकाच व्यासपीठावर सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे दोघींचे नावही समान – वर्मा मॅडम, त्यामुळे उपस्थितांमध्ये या अनोख्या क्षणाची मोठी उत्सुकता आणि आनंद दिसून आला. कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या घडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्राध्यापिका सौ. वर्मा मॅडम यांचे कार्य विशेष गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करून समाजाला सुशिक्षित बनविण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्याचप्रमाणे पोलिस प्रशासनात धाडसी व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एपीआय (API) सौ. वर्मा मॅडम यांनी कायदा व सुव्यवस्था राखताना समाजात महिलांच्या सुरक्षिततेसाठी केलेले कार्यही तितकेच प्रेरणादायी...
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल 9021356277) पाचोरा प्रतिनिधी :- पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे नव्याने भाडोत्री राहण्यासाठी आलेल्या एका सुखी कुटुंबात आज पहाटे दुःखाचा डोंगर कोसळला कारण होते पतीचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय...आणि यातुनच रागाच्या भरात पतीने घरकामासाठी वापरण्यात येणाऱ्या चाकुने पत्नीच्या गळ्यावर व पोटात सपासप वार करत पत्नीला जीवानिशी संपविले... प्रियंका खुशाल भदाणे असे मयत विवाहितेचे नाव असुन पती खुशाल भदाणे याने कृत्य केल्यानंतर गळफास लावुन घेत असतांनाच पाचोरा पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये मयत प्रियंका हिच्या मावशीच्या फिर्यादीवरून खुशाल पाटील याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उ. नि. संजय निकुंभ हे करीत आहेत.
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज पाचोरा : एखाद्या कुटुंबातील तरुण सदस्याचा अकाली मृत्यू ही केवळ त्या घरापुरती मर्यादित शोकांतिका नसते, तर ती संपूर्ण गावाच्या मनाला चटका लावणारी घटना ठरते. भडगाव तालुक्यातील गिरड येथील होतकरू( मालक फॅशन पाचोरा) युवक रविंद्र संजय मोरे (कोळी) यांच्या संशयास्पद मृत्यूने अशीच वेदनादायक परिस्थिती निर्माण झाली. या घटनेनंतर संपूर्ण गिरड गाव शोकसागरात बुडाले, तर दुसरीकडे सत्य समोर यावे आणि न्याय मिळावा या भावनेने नागरिक एकवटले. गिरड हे गाव सामाजिक सलोखा, एकोपा आणि गावाच्या हितासाठी एकदिलाने उभे राहणाऱ्या नागरिकांसाठी ओळखले जाते. जाती-धर्माच्या चौकटींपलीकडे जाऊन गावकऱ्यांनी नेहमीच एकात्मतेचे दर्शन घडविले आहे. त्यामुळे गावातील एका तरुणाच्या मृत्यूची बातमी समोर येताच नागरिकांच्या भावना अनावर होणे स्वाभाविक होते. घटनेनंतर अल्पावधीतच मोठ्या संख्येने नागरिक पाचोरा पोलीस ठाणे परिसरात जमा झाले. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी न्यायाच्या मागणीसाठी एकत्र आले होते. प्रत्येकाच्या मनात एकच प्र...
Comments
Post a Comment