तिरंगा रॅली🇮🇳 द्वारे भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम भारत माता की जय च्या घोषणांनी पाचोरा नगरी दुमदुमली...!






(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) पाचोरा प्रतिनिधी:-
 कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भारतीय नागरिकांच्या हल्ल्याबद्दल मृत्युमुखी पावलेल्या नागरिकांच्या झालेल्या घटना भारतीय सैनिकांनी सडेतोड जवाब देऊन भारतही कमजोर नाही हे सिद्ध करून दाखविले त्यांच्या या चांगल्या कर्तुत्वावर भारतातील नागरिकांनी अनेक ठिकाणी तिरंगा🇮🇳 रॅली काढून त्यांच्या समर्थासाठी पाचोरा शहरातून भारत डेअरी स्टॉप येथून भव्य अशी तिरंगा🇮🇳 रॅली काढण्यात आली या रॅली मध्ये  जवळजवळ 1000 ते 2000 फूट असा तिरंगा ध्वज🇮🇳 घेऊन पाचोरा शहरातील तरुण वर्ग यांनी तसेच महिला यांनी तिरंगा ची रॅली कृष्णापुरी ,आठवडे बाजार, रथ गल्ली,गांधी चौक, जामनेर रोड,श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून हुतात्मा स्मारक येथे त्याचा समारोप करण्यात आला.या रॅलीमध्ये पाचोरा तालुक्याचे आमदार श्री किशोर आप्पा पाटील, माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ,शिवसेना जिल्हाप्रमुख श्री रावसाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्यश्री पदम बापू पाटील एडवोकेट जेडी काटकर एडवोकेट प्रवीण पाटील पिटीसी चेअरमन श्री संजय नाना वाघ शिवसेना जिल्हाप्रमुख श्री रावसाहेब पाटील तहसीलदार श्री विजय बनसोडे साहेब शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री किशोर बारवकर शिवसेना युवा जिल्हाप्रमुख श्री जितेंद्र जैन श्री भोला आप्पा चौधरी श्री बंडू चौधरी माजी नगराध्यक्ष श्री संजय गोहिल श्री शरद पाटे श्री भागवत मालपुरे श्री प्रकाश पाटील श्री रंजीत पाटील सर श्री गोविंद शेलार श्री किशोर संचेती श्री दत्ता आबा बोरसे श्री कांतीलाल जैन श्री रविंद्र पाटील श्री प्रवीण ब्राह्मणे श्री सुनील पाटील आमदार यांचे श्री सहाय्यक श्री राजेश पाटील श्री सुमित किशोर आप्पा पाटील शिवसेना शहरप्रमुख श्री सुमित सावंत श्री भोला पाटील श्री संदीप राजे पाटील श्री बाळू पाटील फौजी श्री विजय येवले श्री अशोक बागड श्री शैलेश येवले श्री रिंकू जैन तसेच डॉक्टर मंडळी वकील मंडळी सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना मुस्लिम बांधव सर्व धर्म उपस्थित होते तसेच यावेळी महिला वर्ग असंख्य उपस्थित होते तसेच पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेबांनी चोख बंदोबस्त ठेवत तिरंगा रॅली शांततेत पार पाडली यावेळी हुतात्मा स्मारक येथे समारोप करण्यात आला त्यावेळी एका वयोवृद्ध आजीला आमदार श्री किशोर आप्पा पाटील व माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांनी साडी चोळी व नारळ फुल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी असंख्य नागरिक उपस्थित होतेश

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद