पाचोरा पिपल्स बॅंकेच्या ATM चे जनतेत महत्वपूर्ण स्थान...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
     (वरखेडी प्रतिनिधी दिलीप पाटील)  मागील १५-२० वर्षापासून प्रतिक्षीत असलेले ATM मागील एक-दीड वर्षापासून सुरू झाले व थोड्याच दिवसात जनतेत सर्वात लोकप्रिय झाले. जिथे इतर ATM सतत रोखीच्या अभावी बंद असतात तिथे पाचोरा पिपल्स बॅंकेचे ATM कायम सुरु राहते. त्यामुळे मागील ७-८ दिवसात जेव्हा काही तांत्रिक अडचणींमुळे ATM बंद होताच प्रत्येकाला अडचण निर्माण झाली. वास्तविक ATM व AC हे वारंटी मध्ये असल्याने कंपनी कडून पार्ट यायला उशीर होत असतो व ते जरी स्वाभाविक असले तरी लोकांच्या अपेक्षा बॅंकेकडून वाढलेल्या असताना अडचणीचे ठरते. असो. कालपासून बॅंकेकडून ATM सेवा पूर्ववत सुरू झाली असून पाचोरा पिपल्सबॅंकेने पाचोरा व्यतिरिक्त शेंदुर्णी, नगरदेवळा व नाशिक येथे सुद्धा ATM सुविधा सुरु केली आहे व जामनेर व जळगाव येथे देखील लवकरच ATM सुरू होणार आहे . बॅंकेची मोबाईल बॅंकिंग व IMPS सेवा सुरू झालेली असून UPI व QR CODE चे टेस्टिंग सुरू आहे. 
बॅंकेने वरील सेवा लवकरात लवकर उपलब्ध करून जिल्ह्यातील ईतर अग्रसर असलेल्या बॅंकेच्या तुलनेत मागील दशकांत निर्माण झालेले अनुशेष भरून काढावा हीच अपेक्षा.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद