ट्रॅव्हलमधून मोबाइल चोरणा-यास अवघ्या दोन तासात पाचोरा पोलिसांनी घेतले जाळ्यात.... कौतुकास्पद कामगिरी...!


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:
शर्मा ट्रॅव्हल्समधून प्रवाशाचा मोबाईल लांबविणाऱ्या चोरट्यास मुद्देमालासह दोन तासात पोलिसांनी अटक केली. बारा तासात संशयिताविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. पोलिसांच्या या धडक कारवाईचे प्रवाशांमधून कौतुक करण्यात येत आहे.

26 में सोमवारी  रात्री 9:00 सुमारास फिर्यादी कौस्तुभ सुनील शिंपी (वय २२, रा. कृष्णापुरी, पाचोरा) हा त्याच्या मित्रासह शर्मा ट्रॅव्हल्सने कल्याणहून पाचोरा येण्यास निघाला. प्रवास करताना 27 में मंगळवारी  सकाळी 4:15 ते 6:30 दरम्यान शर्मा ट्रॅव्हल्समधून सीट क्र.5 आणि क्रं.6 येथून शिंदे इंटरनॅशनल स्कूलसमोर, पाचोरा येथे फिर्यादी व त्याचा मित्र यांचा 80 हजार

रुपये किमतीचा आयफोन व 60 हजार रुपये किमतीचा मोबाईल, असे एकूण एक लाख 40 हजार रुपये किमतीचे मोबाईल हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने लांबवले. यासंबंधीची फिर्याद पाचोरा पोलिसात दिल्याने



अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल होताच अवघ्या 2 तासात आरोपी अन्वरखान माजीद खान (वय वर्षं 21, रा. पहूर कसबे, ता. जामनेर) यास मुद्देमालासह अटक करण्यात आली. ही कारवाई पाचोरा पोलीस चे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. राहुल शिंपी, पो.कॉ. संदीप राजपूत यांनी केली. अटकेमधील आरोपीविरुद्ध 12 तासात चार्जशीट दाखल करण्यात आले. पाचोरा पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राहुल शिंपी तपास करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद