पाचोरा शहरातील प्रभाग क्र. 8 मध्ये बांधकाम कामगारांसाठी ऑनलाईन नोंदणी शिबिर उत्साहात संपन्न....!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा, ता. 30 मे 2025 – आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 8 मध्ये बांधकाम कामगारांसाठी सेफ्टी किट आणि गृह उपयोगी भांड्यांचा संच वाटपासाठी मोफत ऑनलाईन नोंदणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरात सुमारे 140 ते 150 बांधकाम कामगारांनी नोंदणी केली.
याआधी पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्रातील वरखेडी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे किट वाटप सुरु होते. मात्र, पाचोरा शहरातील कामगारांची नोंदणी संख्या पाहता दोन ते तीन दिवसांत सर्वांना नोंदणी करून वाटप करणे शक्य नसल्यामुळे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागनिहाय नोंदणी करून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानंतर प्रभाग क्रमांक 8 मध्ये दिनांक 29 मे 2025 रोजी गुरुवार, सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत, शिवतीर्थ, जय किसान कॉलनी, पाचोरा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात कामगार भगिनींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली.
पूर्वी वरखेडी येथे नोंदणीदरम्यान कामगारांची मोठी गर्दी आणि तणावपूर्ण घटना घडत असल्याने तिथे नोंदणी थांबविण्यात आली होती. मात्र, प्रभागनिहाय नोंदणीच्या निर्णयामुळे पाचोरा शहरात शिबिर व्यवस्थितपणे पार पडत आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
या शिबिराचे आयोजन सागर बंडू सोनार, दिलीप परदेशी, केशव शेलार, भूषण पाटील यांनी केले होते.
कार्यक्रम आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सौजन्याने, मा. सौ. सुनिता ताई पाटील, मा. महेश प्रकाश सोमवंशी, आणि जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार (संपादक – तालुका माझा न्यूज) यांच्या प्रयत्नातून संपन्न झाला.
Comments
Post a Comment