दोंडाईचा येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र यांचा शैक्षणिक उपक्रम....!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल
(दोंडाईचा प्रतिनिधी)
दोंडाईचा येथील कृपा शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय विधायक सेवा समिती द्वारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने शहरातील इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत व विविध स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या संपूर्ण शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील 75 विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
सदर कार्यक्रम हा 25 मे 2025 वार रविवार रोजी सकाळी दहा वाजता हस्ती पब्लिक स्कूल च्या भव्य सभा मंडपात ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हस्ती पब्लिक स्कूलचे व हस्ती बँकेचे चेअरमन कैलास जैन हे होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून शहरातील हृदयरोग तज्ञ डॉ. अनिकेत मंडाले, स्री रोग तज्ञ डॉ. दिलीप पाटील गटशिक्षणाधिकारी डी एस सोनवणे, दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पीआय श्रीकृष्ण पारधी, क्रांतीज्योती सावित्रीबाई शिक्षण परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्रसिंह गिरासे, कार्याध्यक्ष गजेंद्र कानडे, धुळे जिल्हाध्यक्ष जे पी पवार ,संभाजीनगर जिल्हाध्यक्ष अभय नंदन ,अहिल्या नगरचे जिल्हाध्यक्ष चंद्रभान पवार, नाशिक जिल्हाध्यक्ष संतोष इप्पर, नंदुरबार जिल्हाध्यक्ष मनोहर सूर्यवंशी, प्रसिद्धीप्रमुख गोकुळ सोनार, निलेश मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून नूतनचे प्राचार्य बी बी पाटील, मुख्याध्यापक सदाशिव भलकार, मुख्याध्यापिका नीलिमा गिरासे,वैशाली पाटील केंद्रप्रमुख चौधरी सर, बाविस्कर सर ,निमगुळ चे सरपंच दीपक बागुल, जोगसेलू गावाचे सरपंच देसले मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक भाषणात प्रदेशाध्यक्ष जितेंद्र गिरासे यांनी कृपा शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय विधायक सेवा समिती च्या क्रांतीज्योती शिक्षण परिषद मार्फत विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सह होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाणार आहे. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये ओवी बिरारीस, स्पर्धा परीक्षा यशाचे मानकरी नितीन जमादार आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ अनिकेत मंडले यांनी आपल्या खास शैलीत भाषण करताना विद्यार्थ्यांना सांगितले की शिक्षणाला कुठलीही जात धर्म नसते विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलण्यासाठी स्वतःचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. तरच अपेक्षित बदल घडू शकेल असे त्यांनी सांगितले. डॉ दिलीप पाटील यांनी विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे आपले कार्य करावे. विधायक सेवा समिती द्वारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण परिषद मार्फत घेण्यात येणारा विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री गजेंद्र कानडे यांनी तर सूत्रसंचालन श्रीमती चेतना देसले व गोकुळ सोनार सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समितीचे सर्व सदस्य सह हस्ती पब्लिक स्कूलच्या गाडेकर मॅडम सह शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतल.*✍️✍️✍️ श्री पांडुरंग शिंपी पत्रकार दोंडाईचा.*
Comments
Post a Comment