जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.श्री महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते चाळीसगाव वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी श्री नरेंद्र शिंदे यांनी ट्रॅफिक पोलीस म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मानित...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
चाळीसगाव प्रतिनिधी:-
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी साहेब यांच्या हस्ते चाळीसगाव वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी श्री नरेंद्र शिंदे यांनी ट्रॅफिक पोलीस म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला...! पाचोराचाळीसगाव वाहतूक शाखेचे श्री नरेंद्र शिंदे यांनी वाहतूक शाखा पोलीस कर्मचारी म्हणून अनेक बेशिस्त तसेच विना कागदपत्र ट्रिपल सीट विना लायसन तसेच अल्पवयीन मुलांवर कारवाई करून केसेस करून दंडात्मक रक्कम वसूल करून श्री नरेंद्र शिंदे यांनी जिल्ह्यात अनेक पोलीस स्टेशनला काम केलेले असून त्यांनी जळगाव शहर पाचोरा पोलीस स्टेशन चाळीसगाव शहर तसेच चाळीसगाव वाहतूक शाखेला दोन वर्षापासून असून त्यांनी अनेक मोटर वाहन चालकावर तसेच विना कागदपत्र बिना लायसन वाहक चालक तसेच अल्पवयीन मुला मुली यांच्यावर कारवाई करून त्यांना दंडात्मक रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात आली असून त्यांनी चाळीसगाव शहरातील नागरिकांना शिस्त लावून ट्रॅफिक पोलीस म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली त्यांच्या या कामगिरीची दखल जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी साहेब व चाळीसगाव वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रदीप जी एकशिंगे साहेब यांच्या हस्ते बक्षीस पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment