जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कविताताई नेरकर यांच्या हस्ते पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी श्री अमोल पाटील यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
हरे.पिंपळगाव प्रतिनिधी:-
पाचोरा येथील रंगार गल्लीतील रहिवासी श्री अमोल पाटील यांची 2013 मध्ये ठाणे शहर भरती होऊन 2021 रोजी जळगाव जिल्हा येथे बदली करून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे 2023 मध्ये येथे पोलीस भरती झाली असता त्यांना जळगाव जिल्हा पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे त्यांची प्रथमच पोलीस स्टेशनला नियुक्ती झाली असता त्यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशनला आपल्या बुद्धीचा कौशल्याचा वापर करून पोलीस खात्यातील वर्दीचा मान ठेवत त्यांनी उत्तम कामगिरी केली गेल्या दोन वर्षात त्यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशनला अनेक गुन्हे उघडकीस आणून शेतकऱ्यांना एका व्यापाऱ्याने पेमेंट न देता फरार झाला होता त्या व्यापाऱ्याला अटक करून शेतकऱ्याला पैसे वापस मिळून न्याय दिला होता तसेच विविध गुन्ह्यातील आरोपींना अटक केली असून त्यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशनला अनेक उत्तम चांगली कामगिरी केली म्हणून जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेडी साहेबांनी यांनी श्री अमोल पाटील यांचा सत्कार व सन्मान केला यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते साहेब चाळीसगाव विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविताताई नेरकर तसेच पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रकाश काळे साहेब यांच्या हस्ते सन्मान प्रमाणपत्र व सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment