पाचोरा तालुका भाजपा तर्फे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रतिमा भेट देऊन गुरुजनांचा सन्मान...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:
 पाचोरा -आज गुरुवार रोजी गुरुपौर्णिमचे औचित्य साधत ज्येष्ठ व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गुरुजनांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन पाचोरा तालुका भाजपा तर्फे *तालुका अध्यक्ष गोविंद चंद्रकांत शेलार* यांच्या नेतृत्वात सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम लोहठार व बाळद बुद्रुक येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भाजपचे मा.सभापती सुभाष पाटील, प्रमोद सोमवंशी,योगेश माळी, रोहिदास मांडोळे, मधु नाना पाटील, विजुभाऊ परदेशी, जगदीश राजपूत, गौरव पाटील, दत्तात्रय पाटील, उमेश परदेशी, , दीपक पवार तसेच जि.प.शाळा लोहठार व बाळद मुख्याध्यापक  संभाजी पाटील, मुख्याध्यापिका परदेशी मॅडम , वृंदाताई महेश सोमवंशी, बंडू भाऊ सोनार,प्रमोद पाटील सर उपस्थित होते. 
यावेळी खालील ज्येष्ठ गुरुजनांचा सन्मान करण्यात आला व्ही.पी.वाणी सर,व्ही.डो.वाणी,एन.आर.पाटील सर ,ऐ..बी.महाजन सर , प्रदीप सोमवंशी सर, दत्तात्रय भाऊसाहेब निकम, के. एस.पाटील. तसेच आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त श्रीमती विजया भालचंद्र पाटील, श्रीमती वैशाली पुंडलिक पाटील यांचाही सन्मान करण्यात आला 
    याप्रसंगी तालुकाध्यक्ष गोविंद शेलार यांनी या उपक्रमाबद्दल तसेच गुरुपौर्णिमे चे महत्त्व सांगितले, सत्काराला उत्तर देताना व्ही.पी.वाणी सर, प्रदीप सोमवंशी सर, विजया पाटील मॅडम, वैशाली पाटील मॅडम यांनी मार्गदर्शन केले आभार प्रमोद पाटील सर व योगेश माळी यांनी मानले 
या उपक्रमासाठी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली .

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद