चाळीसगावमधून ३१०० वारकऱ्यांची मोफत पंढरपूर वारी; आमदार मंगेश चव्हाण यांची संकल्पना पुन्हा यशस्वी...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
चाळीसगाव (प्रतिनिधी) – दिनांक १२ जुलै रोजी चाळीसगाव शहरातून सुमारे ३१०० वारकरी खास मोफत पंढरपूर वारी स्पेशल ट्रेनने प्रस्थान झाले. ही वारी आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून यंदाही यशस्वीपणे आयोजित करण्यात आली असून, हे सलग पाचवे वर्ष आहे.

रात्री ९ वाजता चाळीसगाव स्थानकावरून रेल्वेने निघालेल्या या भक्तांच्या यात्रेला उत्साही वातावरण लाभले. खास बाब म्हणजे आमदार मंगेश चव्हाण स्वतःही वारकऱ्यांसोबत रेल्वेने पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले.

वारीच्या संपूर्ण प्रवासात – चाळीसगाव ते पंढरपूर –पंढरपूर ते चाळीसगाव वारकऱ्यांसाठी जेवण, राहण्याची व्यवस्था आणि आवश्यक सोयी-सुविधांचे नियोजन आमदार चव्हाण यांनी केले आहे. हजारो वारकऱ्यांना सोबत घेत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पालखीसोबत विठू माऊली च्या गजरात रेल्वे स्टेशन कडे जात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी हजारो वारकरी विशेष ट्रेन ने रवाना झाले.
 
यावेळी नामदार गिरीश महाजन यांनी देखील हजेरी लावली 
चाळीसगाव परिसरातील नागरिकांमध्ये आमदार चव्हाण यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत असून, त्यांच्या सामाजिक सहभागाचे पुन्हा एकदा उदाहरण समोर आले आहे.


*चौकट 1*
*लोकांचा आमदार चव्हाण यांच्या साठी लाल दिव्याचा आग्रह*

आम्ही किती टर्म लढणार आहोत आता पुढे वारस हेच आहे जिल्ह्याला तुम्ही काळजी करू नका नेतृत्व तरुणांकडेच जाणार आहे आणि एक चांगला नेता,उत्कृष्ट नेता,दिलदार नेता तुम्हां मिळाला आहे असे मी नाही महाराष्ट्र म्हणतो - नामदार गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

चौकट 2
  एखाद्या वारकऱ्यांने  विठ्ठलाकडे हट्ट करावा आणि विठ्ठलाने तो पुरवावा  ही शेकडो वर्षाची परंपरा आहे,तसंच माझं थोडस काही आहे,की मी गिरीश भाऊंकडे हट्ट करावा आणि त्यांनी नाही म्हणावे असे कधी झाले नाही - आमदार मंगेश चव्हाण

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..