रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांचे तर्फे पॉकसो कायदा विद्यार्थ्यांचे हक्क व अधिकार यावर मार्गदर्शन...!


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:
पाचोरा विधी सेवा समिती आणि रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांचे तर्फे पॉकसो कायदा,विद्यार्थ्यांचे हक्क व अधिकार यावर आज दि 11जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त मार्गदर्शनपर कार्यक्रम निर्मल इंटरनॅशनल स्कुल पाचोरा येथे आयोजित करण्यात आला. पॉकसो ऍक्ट संदर्भात माहिती रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे अध्यक्ष डॉ मुकेश तेली यांनी केले. यावेळी शाळेत रोटरी तर्फे इन्टेरेक्ट क्लब स्थापन करण्यात आला. यावेळी विधी सेवा समिती सदस्या ललिता पाटील, प्रकाश विसपुते आणि प्रा डॉ वैशाली बोरकर आणि रोटरीचे सचिव डॉ अजयसिंग परदेशी यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. या प्रसंगी वकील संघांचे उपाध्यक्षा सौ कविता मासरे, सदस्य अंबादास गिरी, चंचल पाटील यासोबत रोटरी क्लब चे पदाधिकारी अध्यक्ष डॉ मुकेश तेली, सचिव डॉ अजयसिंग परदेशी, सदस्य चंद्रकांत लोढाया, भरत सिनकर, संजय कोतकर, डॉ सिद्धांत तेली, सौ अरुणा उदावंत तसेच तालुका विधी सेवा समिती सदस्य प्रा डॉ वैशाली बोरकर, सौ ललिता पाटील, प्रकाश विसपुते सोबत शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश राजपूत, पर्यवेक्षिका स्नेहल पाटील सोबत सुमारे 800 विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. या प्रसंगी शाळेतील इन्टेरेक्ट क्लब च्या सर्वं पदाधिकारी व सदस्य यांचे रोटरी क्लब कडून स्वागत करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..