पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल 9021356277)
पाचोरा प्रतिनिधी :-
पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे नव्याने भाडोत्री राहण्यासाठी आलेल्या एका सुखी कुटुंबात आज पहाटे दुःखाचा डोंगर कोसळला कारण होते पतीचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय...आणि यातुनच रागाच्या भरात पतीने घरकामासाठी वापरण्यात येणाऱ्या चाकुने पत्नीच्या गळ्यावर व पोटात सपासप वार करत पत्नीला जीवानिशी संपविले... प्रियंका खुशाल भदाणे असे मयत विवाहितेचे नाव असुन पती खुशाल भदाणे याने कृत्य केल्यानंतर गळफास लावुन घेत असतांनाच पाचोरा पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये मयत प्रियंका हिच्या मावशीच्या फिर्यादीवरून खुशाल पाटील याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उ. नि. संजय निकुंभ हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद