Posts

गौमाता सन्मान अभियाना निमित्त पाचोरा येथील महिलांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल आज दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण राष्ट्रभर सुरू असलेल्या गौ सन्मान आवाहन अभियानाच्या पार्श्वभूमीवर, ज्यांच्या प्रमुख संरक्षक म्हणून गौ माता आणि अध्यक्ष म्हणून नंदी बाबा यांचे मार्गदर्शन आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली गौ सेविकांनी माननीय तहसीलदार साहेबांना सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास प्रार्थना पत्र सादर केले. या प्रार्थना पत्रामध्ये संपूर्ण भारतातील अखिल वेद लक्षणा गौ माता (संपूर्ण देशी गोवंश) यांची विधिवत सेवा, पूर्ण सुरक्षा आणि राष्ट्रीय सन्मान मिळावा, यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा तसेच गोपालन मंत्रालयाची स्थापना करावी, अशी संपूर्ण भारतवासियांच्या वतीने नम्र विनंती करण्यात आली. गौ सेवा, सन्मान आणि सुरक्षा यासाठी हे निवेदन देण्यात आले. या प्रार्थना पत्रासोबत सुमारे ३०० स्वाक्षरी केलेल्या पत्रकांचा समावेश करून लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. या उपक्रमात लिनेस क्लब पाचोराच्या अध्यक्षा प्रा. सौ जयश्रीताई वाघ, सौ.प्रिया लाहोटी, कु.चेतना हिरे तसेच माहेश्वरी समाजाच्या ज्येष्ठ भगिनी सौ मंगल बाहेती , सौ वंदन...

१ मे रोजी पाचोर्‍यात गुणवंतांचा गौरव: स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीत यशस्वी विद्यार्थ्यांचा आमदारांच्या हस्ते सत्कार

Image
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल पाचोरा : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या पुढाकारातून स्पर्धा परीक्षा तसेच पोलीस भरतीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दि. १ मे रोजी सकाळी १० वाजता पाचोरा येथील शिवालय (शिवसेना कार्यालय) येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यात आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव करण्यात येणार असून कार्यक्रमासाठी प्रा. राजेंद्र चिंचोले हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय नगराध्यक्षा सौ. सुनिता पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, नगरपरिषदेचे गटनेते सुमित किशोर पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, तालुका प्रमुख...

‘वॉश आऊट’ मोहीम ठरली गेमचेंजर; पिंपळगाव हरेश्वर परिसरात अवैध धंद्यांना पूर्णविराम — माहिती द्या ९५१८५०६४९४ वर, नाव राहील गोपनीय

Image
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दोन महिन्यांत राबविण्यात आलेल्या ‘वॉश आऊट’ मोहिमेने अवैध धंद्यांच्या मुळावर घाव घातला आहे. सट्टा-पत्ता, जुगार अड्डे आणि गावठी दारू निर्मिती-विक्रीसारख्या बेकायदेशीर कारवायांना अक्षरशः पूर्णविराम मिळाल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे. ही कारवाई केवळ पोलिसी मोहीम नसून सामाजिक बदलाची सुरुवात ठरत असल्याचे जाणकारांचे मत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम उभारली. डोंगरी, सातगाव, पिंपळगाव हरेश्वर, लोहारा, कुऱ्हाड खुर्द, वरखेडी, कळमसरा, शिंदाड यांसारख्या गावांमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात त्यांनी थेट मोर्चा उघडला. छापेमारी, सतत गस्त आणि गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी जाळे उध्वस्त झाले. या अवैध व्यवसायांचा सर्वात मोठा फटका बसत होता तो सर्वसामान्य नागरिकांना. तरुण पिढी व्यसनांच्या गर्तेत ओढली जात होती, कुटुंबांमध्ये तणाव वाढत होता आणि सामाजिक वातावरण बिघडत होते. मात्र, प...

“लेडी सिंघम” कल्याणी वर्मा यांचा धडाका; हरेश्वर पिंपळगावसाठी पुढील ५ वर्षे त्यांचीच नियुक्ती करा – महिला व नागरिकांची आक्रमक मागणी!

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार यांनी महिलांना विविध क्षेत्रांत ३० ते ३३ टक्के आरक्षण दिल्यामुळे आज महिला सक्षमीकरणाला नवे बळ मिळत आहे. याच धोरणाचा सकारात्मक परिणाम पोलीस खात्यातही स्पष्टपणे दिसून येत असून, जळगाव जिल्ह्यात अनेक पोलीस ठाण्यांमध्ये महिला अधिकारी प्रभावीपणे काम करताना दिसत आहेत. जळगाव जिल्ह्यात साधारणतः ८ ते १० पोलीस ठाण्यांमध्ये महिला अधिकारी कार्यरत असून, त्यामध्ये हरेश्वर पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांचे नाव विशेष ठळकपणे समोर येत आहे. गेल्या एक वर्षापासून त्या येथे कार्यरत असून, त्यांनी आपल्या धडाकेबाज आणि निर्भीड कारवाईमुळे संपूर्ण परिसरात गुन्हेगारीवर वचक निर्माण केला आहे. एपीआय कल्याणी वर्मा यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर जोरदार कारवाईचा सपाटा लावला. त्यांच्या कठोर भूमिकेमुळे दोन नंबरचे व्यवसाय करणाऱ्यांनी अक्षरशः आपले बस्तान गुंडाळत इतर मार्ग स्वीकारले आहेत. परिणामी, पिंपळगाव परिसरात शांतता, कायदा आणि सुव्यवस्थेचे वातावरण अधिक मजबूत झाले आहे. तरुण, धाडसी आण...

पाचोरा येथे भव्य आध्यात्मिक बालसंस्कार शिबिराचे आयोजन...!संस्कार घडविण्यासाठी सुवर्णसंधी; शिबीर पूर्णतः विनामूल्य

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चैनल पाचोरा येथे लक्ष्मीमाता वारकरी शिक्षण संस्था यांच्या वतीने भव्य आध्यात्मिक बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवर्य विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर व ह.भ.प. बाजीराव नाना चंदिले (आळंदी) यांच्या आशिर्वादाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, आजच्या पिढीला सुसंस्कारित करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, टीव्ही आदी माध्यमांमुळे मुलांमध्ये वाढत चाललेल्या वाईट सवयींना आळा घालण्यासाठी तसेच मुलांमध्ये नैतिक मूल्ये, संस्कार आणि शिस्त रुजविण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “आजचा बालक उद्याचा जबाबदार नागरिक” या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. हे शिबीर दि. ०५ मे २०२६ (मंगळवार) पासून सुरू होऊन दि. १५ मे २०२६ (शुक्रवार) रोजी सांगता होणार आहे. शिबिरात मुला-मुलींना योगासन, गीता, हनुमान चालिसा, मृदुंग मार्गदर्शन, वारकरी भजन, हरिपाठ, मंत्रपुष्पांजली तसेच व्यक्तिमत्व विकासाचे धडे दिले जाणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे हे शिबीर पूर्णतः विनामूल्य असून, पालकांसाठी कोणतेही शुल्क नाही. तसेच आयोजकांकडून स...

पाचोरा येथील लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे संचालक श्री संजय कुमावत यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंत्राटदार संघटनेच्या सचिवपदी निवड

Image
✍️ राजेंद्र खैरनार – मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चॅनल पाचोरा येथील लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे संचालक व उत्कृष्ट तसेच पारदर्शी बांधकाम व्यवसायिक म्हणून ओळख असलेले श्री. संजय कुमावत यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंत्राटदार संघटनेच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे. श्री. संजय कुमावत हे पाचोरा शहरातील नामांकित बिल्डर असून त्यांनी शहरात अनेक घरे व रोहाऊस प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. त्यांच्या माध्यमातून रस्ते व गटारींची कामे अत्यंत उत्कृष्ट दर्जाने, कोणतीही तडजोड न करता पारदर्शक पद्धतीने करण्यात आली आहेत. त्यांच्या दर्जेदार कामामुळे त्यांनी बिल्डर क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करत जिल्हाभर लौकिक मिळवला आहे. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत त्यांना जिल्ह्याबाहेरही मोठ्या प्रकल्पांची संधी मिळत आहे. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू व हसतमुख असून त्यांच्या कार्यपद्धतीत “दुश्मनी” हा शब्द नसून “मैत्री” हाच मंत्र आहे. सर्व राजकीय पक्षांतील नेते व विविध क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांचे चांगले संबंध आहेत. मात्र, या संबंधांच्या आड त्यांनी कधीही आपल्या व्यवसायात तडजोड केलेली नाही. त्यांच्या य...

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सचिव आण्णासो. प्रभाकर कृष्णराव सोनवणे(कोळी) यांचे लहान बंधू सुरेश कृष्णराव सोनवणे यांचे निधन

Image
— राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक (सत्य योजना न्यूज पोर्टल) पाचोरा : येथील रहिवासी तथा भडगाव पंचायत समितीचे माजी कार्यालयीन अधीक्षक कै. सुरेश कृष्णराव सोनवणे यांचे दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6:00 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पाचोरा शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ते पाचोरेकर पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सचिव श्री. प्रभाकर कृष्णा सोनवणे यांचे लहान बंधू होत. त्यांच्या पश्चात कुटुंबीय व आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2:00 वाजता राहत्या घरातून, सिंधी कॅम्प, दसरा मैदान जवळ, पाचोरा येथून निघणार आहे. त्यांच्या निधनाने सोनवणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून समस्त कोळी समाज, पाचोरा यांच्याकडूनही शोक व्यक्त करण्यात येत आहे. ईश्वर चरणी प्रार्थना की, दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो व त्यांच्या परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो.