पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सचिव आण्णासो. प्रभाकर कृष्णराव सोनवणे(कोळी) यांचे लहान बंधू सुरेश कृष्णराव सोनवणे यांचे निधन

— राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक (सत्य योजना न्यूज पोर्टल)
पाचोरा : येथील रहिवासी तथा भडगाव पंचायत समितीचे माजी कार्यालयीन अधीक्षक कै. सुरेश कृष्णराव सोनवणे यांचे दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6:00 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पाचोरा शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ते पाचोरेकर पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सचिव श्री. प्रभाकर कृष्णा सोनवणे यांचे लहान बंधू होत. त्यांच्या पश्चात कुटुंबीय व आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2:00 वाजता राहत्या घरातून, सिंधी कॅम्प, दसरा मैदान जवळ, पाचोरा येथून निघणार आहे.
त्यांच्या निधनाने सोनवणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून समस्त कोळी समाज, पाचोरा यांच्याकडूनही शोक व्यक्त करण्यात येत आहे.
ईश्वर चरणी प्रार्थना की, दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो व त्यांच्या परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..