१ मे रोजी पाचोर्यात गुणवंतांचा गौरव: स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीत यशस्वी विद्यार्थ्यांचा आमदारांच्या हस्ते सत्कार
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या पुढाकारातून स्पर्धा परीक्षा तसेच पोलीस भरतीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दि. १ मे रोजी सकाळी १० वाजता पाचोरा येथील शिवालय (शिवसेना कार्यालय) येथे संपन्न होणार आहे.
या सोहळ्यात आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव करण्यात येणार असून कार्यक्रमासाठी प्रा. राजेंद्र चिंचोले हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय नगराध्यक्षा सौ. सुनिता पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, नगरपरिषदेचे गटनेते सुमित किशोर पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, तालुका प्रमुख विनोद तावडे, राजेंद्र पाटील तसेच समाधान पाटील, सुधाकर पाटील, सुमित सावंत, भोला पाटील, अजय चौधरी, नंदकिशोर देवरे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण तसेच यापूर्वी विविध परीक्षांमध्ये यश मिळवलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी या प्रेरणादायी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या उपक्रमाचे संयोजन सुधीर पाटील करत असून अधिक माहितीसाठी ९९२१२११६७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment