पाचोरा येथील लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे संचालक श्री संजय कुमावत यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंत्राटदार संघटनेच्या सचिवपदी निवड


✍️ राजेंद्र खैरनार – मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा येथील लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे संचालक व उत्कृष्ट तसेच पारदर्शी बांधकाम व्यवसायिक म्हणून ओळख असलेले श्री. संजय कुमावत यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंत्राटदार संघटनेच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
श्री. संजय कुमावत हे पाचोरा शहरातील नामांकित बिल्डर असून त्यांनी शहरात अनेक घरे व रोहाऊस प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. त्यांच्या माध्यमातून रस्ते व गटारींची कामे अत्यंत उत्कृष्ट दर्जाने, कोणतीही तडजोड न करता पारदर्शक पद्धतीने करण्यात आली आहेत. त्यांच्या दर्जेदार कामामुळे त्यांनी बिल्डर क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करत जिल्हाभर लौकिक मिळवला आहे. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत त्यांना जिल्ह्याबाहेरही मोठ्या प्रकल्पांची संधी मिळत आहे.
त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू व हसतमुख असून त्यांच्या कार्यपद्धतीत “दुश्मनी” हा शब्द नसून “मैत्री” हाच मंत्र आहे. सर्व राजकीय पक्षांतील नेते व विविध क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांचे चांगले संबंध आहेत. मात्र, या संबंधांच्या आड त्यांनी कधीही आपल्या व्यवसायात तडजोड केलेली नाही.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण कंत्राटदार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. राजीव कृष्णानी (पुणे) व प्रदेश कार्यकारिणीने त्यांची सचिवपदी निवड केली. यावेळी उपाध्यक्ष श्री. आर. ये. घुले (पालघर), उपाध्यक्ष श्री. आर. के. मदानी (मुंबई), खजिनदार श्री. रानडे (पुणे) तसेच राज्यातील विविध कंत्राटदार उपस्थित होते.
या निवडीप्रसंगी प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की, “श्री. संजय कुमावत यांचा दांडगा अनुभव, अभ्यासू व्यक्तिमत्व व व्यापक संपर्क संघटनेसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. त्यांच्या माध्यमातून कंत्राटदारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देऊन संघटनेला बळ मिळेल.”
या निवडीबद्दल पाचोरा शहरातील आजी-माजी आमदार, व्यापारी, सामाजिक संघटना, पत्रकार तसेच मित्रपरिवाराकडून श्री. संजय कुमावत यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद