पाचोरा येथे भव्य आध्यात्मिक बालसंस्कार शिबिराचे आयोजन...!संस्कार घडविण्यासाठी सुवर्णसंधी; शिबीर पूर्णतः विनामूल्य

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चैनल
पाचोरा येथे लक्ष्मीमाता वारकरी शिक्षण संस्था यांच्या वतीने भव्य आध्यात्मिक बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवर्य विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर व ह.भ.प. बाजीराव नाना चंदिले (आळंदी) यांच्या आशिर्वादाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, आजच्या पिढीला सुसंस्कारित करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, टीव्ही आदी माध्यमांमुळे मुलांमध्ये वाढत चाललेल्या वाईट सवयींना आळा घालण्यासाठी तसेच मुलांमध्ये नैतिक मूल्ये, संस्कार आणि शिस्त रुजविण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “आजचा बालक उद्याचा जबाबदार नागरिक” या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे.
हे शिबीर दि. ०५ मे २०२६ (मंगळवार) पासून सुरू होऊन दि. १५ मे २०२६ (शुक्रवार) रोजी सांगता होणार आहे. शिबिरात मुला-मुलींना योगासन, गीता, हनुमान चालिसा, मृदुंग मार्गदर्शन, वारकरी भजन, हरिपाठ, मंत्रपुष्पांजली तसेच व्यक्तिमत्व विकासाचे धडे दिले जाणार आहेत.
महत्वाची बाब म्हणजे हे शिबीर पूर्णतः विनामूल्य असून, पालकांसाठी कोणतेही शुल्क नाही.
तसेच आयोजकांकडून स्पष्ट सूचना देण्यात आली आहे की,
👉 शिबिरात सहभागी होताना पालकांनी मुला-मुलींचे आधार कार्ड (ओळखपत्रासाठी आवश्यक) याची झेरॉक्स प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
शिबिरासाठी येताना विद्यार्थ्यांनी आंथरूण-पांघरूण, ताट-तांब्या, दैनंदिन वापराच्या वस्तू तसेच पारंपरिक पोशाख (धोतर, नेहरू सदरा, टोपी किंवा पांढरा पोषाख) सोबत आणणे आवश्यक आहे. शिबिरादरम्यान मोबाईल व कॅमेरा वापरण्यास सक्त मनाई असून, गैरवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिबिरातून घरी पाठविण्यात येईल.
हे शिबीर वारकरी भवन, रामदेव लॉन्सच्या पाठीमागे, जारगाव चौफुली, पाचोरा येथे पार पडणार आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी अनाथांची माय ह.भ.प. सौ. सुनिताताई पाटील व ह.भ.प. भागवताचार्य योगेशजी महाराज (धामणगावकर) यांचे मार्गदर्शन लाभत असून, निखिल महाराज पाटील व कार्तिकीताई पाटील हे निमंत्रक म्हणून कार्यरत आहेत.
तरी सर्व पालकांनी आपल्या मुलांना या भव्य संस्कार शिबिरात सहभागी करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..