Posts

श्री सु.भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे पालक संवाद सभा उत्साहात संपन्न

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल पाचोरा प्रतिनिधी : पा.ता.स.शि.संस्था संचलित श्री सु.भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिर, पाचोरा (भडगाव रोड) येथे दिनांक ११ मार्च २०२६ रोजी पालक संवाद सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व पालक यांच्यात सुसंवाद निर्माण करणे हा या सभेचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. जयश्रीताई वाघ यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच पालक प्रतिनिधी म्हणून संजय सोनवणे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय उज्वला साळुंखे मॅडम, गो.से. हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक आर. डी. बोरसे सर, शिक्षक रुपेश पाटील सर, भडगाव रोड विभागाचे विभाग प्रमुख दीपक पाटील सर तसेच ज्येष्ठ शिक्षिका सारिका पाटील मॅडम यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी विभाग प्रमुख दीपक पाटील सर यांनी प्रास्ताविक सादर करत पालकांशी संवाद साधण्याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच शाळेत राबविण्यात येणा...

रमजान निमित्त पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये इफ्तार मेळावा; हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल पाचोरा : पवित्र रमजान महिन्यानिमित्त पाचोरा पोलीस स्टेशन येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सौहार्दाचा संदेश देण्यात आला. पाचोरा पोलीस स्टेशनच्या वतीने मुस्लिम बांधवांसह हिंदू समाजातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांना इफ्तार पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. रमजानच्या पवित्र महिन्यात रोजा सोडल्यानंतर सर्वांनी एकत्र येत इफ्तार केला आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी पाचोरा पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) श्री. बापू रोहम, पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार, ज्येष्ठ पत्रकार व प्राध्यापक सी. एन. चौधरी सर, प्रा. शिवाजी शिंदे सर तसेच शहरातील अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मुस्लिम समाजातील मौलाना व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार...

भडगाव महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान; शिक्षण व स्वावलंबनाचा संदेश

Image
भडगाव : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, भडगाव येथे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान करण्यात येत महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि करिअरकडे वाटचाल करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुनील शेलार होते, तर प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. चित्रा पाटील यांनी केले. यावेळी प्रमुख वक्ते डॉ. गायकवाड यांनी आपल्या भाषणात महिलांनी घरकामाबरोबरच शिक्षण व करिअरसाठी प्रयत्नशील राहावे, स्वतःची ओळख निर्माण करावी असे मार्गदर्शन केले. अध्यक्ष प्रा. डॉ. सुनील शेलार यांनी महिलांनी केवळ चूल आणि मूल यापुरते मर्यादित न राहता उद्योग-व्यवसाय, कौशल्य विकास आणि स्वावलंबनाकडे वाटचाल करावी, असे प्रेरणादायी विचार मांडले. प्रा. डॉ. चित्रा पाटील यांनी महिला दिनाचे महत्त्व, त्यामागील इतिहास आणि समाजातील महिलांच्या योगदानाबाबत मनोगत व्यक्त केले. या कार्...

अश्लील व्हिडिओच्या धमकीतून खून; पती-पत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल  पाचोरा प्रतिनिधी पाचोरा : पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन हद्दीतील वरसाडे तांडा (ता. पाचोरा) येथे बेपत्ता झालेल्या तरुणाच्या प्रकरणाचा तपास करताना खुनाचा थरारक प्रकार उघडकीस आला असून अश्लील व्हिडिओच्या धमकीतून हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वरसाडे तांडा नं. ३ येथील संजय भिमा राठोड (वय ३३, व्यवसाय मजुरी) यांनी दिलेल्या खबरीनुसार त्यांचा भाऊ विजय भिमा राठोड (वय २५) हा दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री साडेअकरा ते दि. २५ फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजेच्या दरम्यान राहत्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेला होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून न आल्याने पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन येथे दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी मिसिंग रजिस्टर क्रमांक १५/२०२६ अन्वये बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित इसम संजय परशुरा...

पाचोरा तालुकास्तरीय " मिशन स्कॉलरशिप " कार्यशाळा उत्साहात संपन्न

Image
पाचोरा - इयत्ता चौथी व सातवी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा चालू शैक्षणिक वर्षापासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे.पाचोरा तालुक्यातील सर्व शाळांचे सुमारे दोन हजार चारशे विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यांना मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने पाचोरा शिक्षण विभागाने शिक्षकांची कार्यशाळा आयोजित केली होती. मिशन स्कॉलरशिप कार्यशाळेला गट शिक्षणाधिकारी विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील, शा पो आ अधीक्षक सरोज गायकवाड, राजेंद्र पाटील सर, सुभाष देसले सर उपस्थित होते. सूत्रसंचालन संजू राठोड यांनी केले. आभार विजय ठाकूर यांनी मानले. मिशन स्कॉलरशिप समन्वयक सुभाष देसले सर यांनी परीक्षेचे स्वरूप, विविध युक्त्या, क्लुप्त्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन उपस्थित शिक्षकांना केले. गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांनी मार्गदर्शन करतांना प्रत्येक शाळेत शिष्यवृत्ती सराव घेणे त्यासोबत पर्यावरण शिक्षण, आरोग्य शिक्षण तासिका घेणे, असाक्षर वर्ग सुरु करणे या सूचना दिल्या.शा पो आ अधीक्षक सरोज गायकवाड यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्व विषद केले. सदर कार्यशाळेत पी एच डी संपादन केल्याबद्दल शिक्षक डॉ ...

"अमृत मित्र महोत्सवात पाचोरा शहराचा गौरव; ‘वूमन फॉर ट्रीज’ उपक्रमात 80 महिला बचत गटांचे प्रतिनिधित्व”

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल पाचोरा प्रतिनिधी:- केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत “वूमन फॉर ट्रीज” उपक्रमात सहभागी झालेल्या महिला बचत गटांचा गौरव करण्यासाठी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे दि. 13 मार्च रोजी “अमृत मित्र महोत्सव” हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय शहरी विकास मंत्री मनोहरलाल खट्टर होते. यावेळी शहरी विकास खात्याचे सचिव, सहसचिव तसेच विविध अधिकारी उपस्थित होते. देशभरातील सुमारे 30 राज्यांमधून महिला बचत गटांचे प्रतिनिधी या महोत्सवासाठी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, एका नगरपरिषदेतून सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारे शहर म्हणून पाचोरा शहरातील तब्बल 80 महिला बचत गटांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते, ही बाब विशेष ठरली. या कार्यक्रमात अमृत योजनेविषयी आयोजित चर्चासत्रात पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना आपले विचार मांडण्याची संधी देण्यात आली. त्यांनी पाचोरा शहरात महिला बचत गटांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. शहरात उपलब्ध अ...

लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदार यादी पुनरीक्षण अभियान; प्रांताधिकारी भूषण अहिरे यांचे

Image
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल पाचोरा : भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी एसआरआय (विशेष सखोल पुनरीक्षण) मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात विशेष मतदार यादी पुनरीक्षण अभियान सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत पाचोरा तालुक्यात २३३ तर भडगाव तालुक्यात १२१ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारांनी आवश्यक माहिती देऊन या प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी केले आहे. मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेचा उद्देश अचूक, अद्ययावत व पारदर्शक मतदार यादी तयार करणे हा असून, ही लोकशाही व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते. या प्रक्रियेत विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची नोंदणी व अद्ययावतीकरण केले जात आहे. स्थानिक व ग्रामपातळीवर नवीन मतदारांची नोंदणी, मतदार यादीतील त्रुटी दुरुस्ती, मृत किंवा दुबार नावे वगळणे यावर विशेष भर देण्यात येत आहे. तसेच २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदान केलेल्य...