श्री सु.भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे पालक संवाद सभा उत्साहात संपन्न


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी :
पा.ता.स.शि.संस्था संचलित श्री सु.भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिर, पाचोरा (भडगाव रोड) येथे दिनांक ११ मार्च २०२६ रोजी पालक संवाद सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व पालक यांच्यात सुसंवाद निर्माण करणे हा या सभेचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. जयश्रीताई वाघ यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच पालक प्रतिनिधी म्हणून संजय सोनवणे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय उज्वला साळुंखे मॅडम, गो.से. हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक आर. डी. बोरसे सर, शिक्षक रुपेश पाटील सर, भडगाव रोड विभागाचे विभाग प्रमुख दीपक पाटील सर तसेच ज्येष्ठ शिक्षिका सारिका पाटील मॅडम यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विभाग प्रमुख दीपक पाटील सर यांनी प्रास्ताविक सादर करत पालकांशी संवाद साधण्याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची माहिती पालकांना दिली. यानंतर ज्येष्ठ शिक्षिका सारिका पाटील मॅडम, आर. डी. बोरसे सर आणि मुख्याध्यापिका उज्वला साळुंखे मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शनपर विचार मांडले. अध्यक्षीय मनोगतात प्रा. जयश्रीताई वाघ यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांनी शाळेशी सतत संपर्क ठेवण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था, जळगाव आयोजित पुरस्कार वितरण समारंभात उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल ‘ज्ञानवंत शिक्षक पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल श्रीमती रूपाली उल्हास पाटील-साळुंखे मॅडम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जयश्री पाटील मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती रूपाली निकम मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सहकारी शिक्षकवृंदांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद