भडगाव महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान; शिक्षण व स्वावलंबनाचा संदेश

भडगाव :
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, भडगाव येथे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान करण्यात येत महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि करिअरकडे वाटचाल करण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुनील शेलार होते, तर प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. चित्रा पाटील यांनी केले.
यावेळी प्रमुख वक्ते डॉ. गायकवाड यांनी आपल्या भाषणात महिलांनी घरकामाबरोबरच शिक्षण व करिअरसाठी प्रयत्नशील राहावे, स्वतःची ओळख निर्माण करावी असे मार्गदर्शन केले. अध्यक्ष प्रा. डॉ. सुनील शेलार यांनी महिलांनी केवळ चूल आणि मूल यापुरते मर्यादित न राहता उद्योग-व्यवसाय, कौशल्य विकास आणि स्वावलंबनाकडे वाटचाल करावी, असे प्रेरणादायी विचार मांडले.
प्रा. डॉ. चित्रा पाटील यांनी महिला दिनाचे महत्त्व, त्यामागील इतिहास आणि समाजातील महिलांच्या योगदानाबाबत मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. इंदिरा लोखंडे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..